कृषी व व्यापारमहाराष्ट्र

थायोमेथोक्झामच्या बिज प्रक्रियेद्वारा करा सोयाबिनवरील खोडमाशीचे व्यवस्थापन

 

       

        सांगली : किटकशास्त्र विभागाने बिज प्रक्रिया करूनच सोयाबीन पीक पेरावे या संदर्भात संदेश प्रसारीत केला होता. ज्या शेतकऱ्यांनी बिज प्रक्रिया केली तेथे खोडमाशीवा प्रादुर्भाव अल्प प्रमाणात दिसून आला. त्यामुळे हंगामाच्या सुरुवातीपासूनच या किडीच्या व्यवस्थापणासाठी बिज प्रक्रिया करूनच लागवड करावीअसे डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठअकोला किटकशास्त्र विभाग प्रमुख डॉ. डी. बी. उंदिरवाडे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.

या किडींचा प्रादुर्भाव पिकाचे रोपावस्थेपासूनच म्हणजे रोप 10 ते 15 दिवसाचे झाल्यानंतर होतो त्यामुळे त्याचा ताटाचे संख्येवर विपरीत परिणाम होऊन पीकाची दुबार पेरणीची शक्यता असते मात्र बिजप्रक्रिया केल्यास सोयाबीनचे पीक जवळपास 25 ते 30 दिवस पर्यंत या किडीस कमी प्रमाणात बळी पडते.

किडीचा जीवनक्रम व नुकसानीचा प्रकार – खोड माशी लहानचमकदार काळ्या रंगाची असून त्यांची लांबी 2 मि.मी. असते. अंड्यातून निघालेली अळी पाय नसलेलीफिक्कट पिवळ्या रंगाची २-४ मि.मी. लांब असते. ही अळी प्रथम जवळच्या पानाच्या शिरेला छिद्र करते. अळी नंतर पानाच्या देठातून झाडाचे मुख्य खोडात किंवा फांदीत प्रवेश करुन आतील भाग पोखरुन खाते. प्रादूर्भावग्रस्त खोड चिरून पाहिल्यास पांढूरक्या रंगाची अळी किंवा कोषला लसर नागमोडी भागात दिसतेखोडमाशीचा प्रादुर्भाव पिकाच्या सुरुवातीच्या अवस्थेत झाल्यास किडग्रस्त झाड वाळते व मोठ्या प्रमाणात नुकसान होतेमोठ्या रोपावर असा परिणाम दिसत नाहीपरंतु अशा रोपावर खोडमाशीच्या अळीचे प्रौढमाशीला बाहेर येण्यासाठी केलेले छिद्र आढळते. खोडमाशीची अळी तसेच कोष फांद्यातखोडात असतो. अशा किडग्रस्त रोपावरील फुलांची गळ होते व शेंगातील दाण्याचे वजन कमी होऊन उत्पादनात 16-30 टक्के घट होते.

सोयाबीन पिकाची पेरणी करण्यापूर्वी बियाण्यास रासायनिक किटकनाशक थायोमेथोक्झाम 30 टक्के एफ एस (उदा. पोलोगोल्डस्लेअर प्रो) 10 मि.ली. / 1 कि. बियाणे बिजप्रक्रिया करूनच पेरणी करावी त्यामुळे सुरुवातीच्या 25 ते 30 दिवस सोयबीन पीक खोड माशी या किडीच्या प्रादुर्भावापासून मुक्त राहते. बिज प्रक्रिया करताना सर्वप्रथम रासायनिक बुरशीनाशकाची बिज प्रक्रिया करावी त्यानंतर रासायनिक किटकनाशकाची व सर्वात शेवटी जैविक बुरशीनाशक व जैविक संर्वधकाची बिज प्रकिया करावी. सोयाबीन पिकामधे उगवणीनंतर आठ ते दहा दिवसानंतर पिवळे चिकट सापळे लावून नियमीत खोडमाशीच्या प्रादुर्भावर लक्ष ठेवावे (25/हे.). ज्या ठिकणी काही कारणा अभावी सोयाबीन बियाण्यास थायोमेथोक्झामची बिजप्रक्रिया केली नसल्यास सोयाबीनचे पीक 15 दिवसाचे झाल्यानंतर इथियॉन 50 टक्के (उदा. गोल्डमिट 50इथिकलटॅफेथिऑन) 30 मि.ली. किंवा इंडोक्झाकार्ब 15.8 टक्के (उदा. इंडोगोल्ड प्लसफेगो) 6.7 मि.ली. किंवा क्लोरॅट्रेनिप्रोल 18.5 टक्के (उदा. कोराजनकव्हर लिक) 3.0 मि.ली. प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

या किडीच्या वाढीसाठी उष्ण तापमान जास्त आर्द्रताभारी पाऊस व त्यानंतर कोरडे वातावरण पोषक आहे. असे वातावरण आढळल्यास शेतकऱ्यांनी आपल्या सोयाबिन पिकाचे नियमित सर्वेक्षण करून सतर्क राहून नियंत्रणाचे उपाय योजावेतअसे डॉ. डी. बी. उंदिरवाडे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.

——–+———+———-+——-

 

 

पलूस येथील शासकीय वसतिगृहात प्रवेश प्रक्रिया सुरू

 

        सांगली : पलूस येथील गुणवंत मुलांचे शासकीय वसतिगृहात राज्यातील अनुसूचित जातीअनुसूचित जमातीविजाभजइतर मागासवर्गीयविशेष मागासवर्गीयआर्थिकदृष्ट्या  मागासवर्गअनाथ व अपंग या सर्व प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना वसतिगृहातील रिक्त जागेवर विनामुल्य प्रवेश देण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती वसतिगृहाचे अधिक्षक मनिष पानगांवकर यांनी दिली.

सन 2024-25 या शैक्षणिक वर्षात पलूस तालुका व जवळील तालुक्यात इयत्ता 11 वीअभियांत्रिकी पदविका व व्यवसाय शिक्षण अभ्यासक्रम (आय.टी.आय) मध्ये नियमित शिक्षण घेत असलेल्या परगांवावरुन ये-जा करणाऱ्या (पलूस स्थानिक विद्यार्थी सोडून) विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह प्रवेश प्रक्रिया ऑफलाईन सुरू आहे. अशा गरीब होतकरू विद्यार्थ्यांनी फॉर्म भरण्याकरिता वसतिगृहात येऊन नोंदणी करून अर्ज घेऊन जावे, असे आवाहन वसतिगृहाचे अधिक्षक यांनी केले आहे.

वसतीगृह गुणवंत मुलांचे असल्याने फक्त इयत्ता 11 वीप्रथम वर्ष अभियांत्रिकी डिप्लोमा व अभियांत्रिकी आय.टी.आय करीता प्रवेश पात्र असेल. तसेच अनुसूचित जातीअनुसूचित जमातीविजाभजइतर मागासवर्गीयविशेष मागासवर्गीयआर्थिकदृष्या मागासवर्गअनाथ व अपंग या सर्व प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना इयत्ता 10 वी मध्ये किमान 55 टक्के पेक्षा जास्त गुण आवश्यक आहेतअसे वसतिगृहाचे अधिक्षक यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.

—————————————

 

चारधाम यात्रेसाठी नोंदणी अनिवार्य

 

सांगली : धाम येथील दर्शनाची प्रक्रिया सुरळीत करण्यासाठी उत्तराखंड शासनाने चारधाम यात्रेसाठी नोंदणीची प्रक्रिया सुरू केली आहे. नोंदणी अनिवार्य असून भाविकांनी चारधाम यात्रा 2024 साठी https://registrationandtouristcare.uk.gov.in/ वर नोंदणी करणे आवश्यक आहे. ज्या तारखेसाठी भक्तांनी नोंदणी केली असेल त्या तारखेलाच धाम येथे दर्शनाची परवानगी असेल.

वृद्ध आणि वैद्यकीय पार्श्वभूमी असलेल्यांनी त्यांची यात्रा सुरू करण्यापूर्वी स्वतःची वैद्यकीय तपासणी करून घ्यावीयाबरोबरच वैद्यकीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागउत्तराखंड शासनाने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करावे. याबाबतच्या मार्गदर्शक सूचना  https://health.uk.gov.in/pages/display/140-char-dham-yatra-health-advisory वर उपलब्ध आहेतअसे प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविण्यात आले आहे.

———————————————–

 

तृतीयपंथीयांसाठी 21 जून रोजी विशेष कार्यशाळा

 

सांगली : तृतीयपंथीयांना ओळखपत्रे व प्रमाणपत्रे वितरीत करणेत्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी त्यांची प्राथमिक माहिती संकलित करणेतृतीय पंथीयांच्या हक्कांचे संरक्षण व कल्याणबाबत काही अडचणीसमस्या असल्यास त्या जाणून घेणे,  या व्यक्तींच्या शासनाप्रती असणाऱ्या अपेक्षा जाणून घेण्यासाठी दि21 जून 2024 रोजी विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलेले आहेही कार्यशाळा सहाय्यक आयुक्तसमाज कल्याण सांगलीडॉबाबासाहेब आंबेडकरसामाजिक न्याय भवनजुना बुधगांव रोडसांगली येथे होणार असून या  कार्यशाळेस जिल्ह्यातील सर्व तृतीयपंथीय व्यक्तींनी उपस्थित रहावेअसे आवाहन समाज कल्याण कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त जयंत चाचरकर यांनी केले आहे.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून तृतीयपंथीय व्यक्तींना ओळखपत्र व प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी National Portal for Transgender Persons  हे पोर्टल दि25 नोव्हेंबर 2020 पासून सुरू करण्यात आले आहेtransgender.dosje.gov.in या लिंकद्वारे तृतीयपंथी व्यक्ती ते कुठेही असतील तेथून अर्ज करू शकतातया पोर्टलवरून अधिकाधिक तृतीयपंथीयांना ओळखपत्रे व प्रमाणपत्रे देण्यासाठी त्यांच्या माहितीचे संकलन करणे आवश्यक आहेयाकामी जिल्हास्तरीय तृतीयपंथीय तक्रार निवारण समितीच्या मान्यतेने सर्व्हेक्षण अर्ज मंजूर करण्यात आलेला आहे.

या कार्यशाळेसाठी तृतीयंपथीय व्यक्ती यांनी त्यांचे आधारकार्डमतदानकार्डपॅनकार्डजन्माचा दाखलारेशनकार्डपासपोर्टपासबुकजातीचा दाखलामनरेगाकार्ड शैक्षणिक पात्रताबाबत कागदपत्रेदिव्यांग असलेस प्रमाणपत्र इनमूद दस्तऐवजांची छायांकित प्रत झेरॉक्स प्रत सोबत घेवून येणे आवश्यक असेलअसे प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.

 

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!