महाराष्ट्रराजकीयसामाजिक
पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांचे नागरिकांना आवाहन

कोल्हापूरः अनिल पाटील
कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या चार दिवसापासून प्रचंङ पाऊस कोसळत असून सर्व नद्यानां पूर आला असून या पूर परिस्थितीमध्ये नागरिकांनी प्रशासनाकडून येणाऱ्या सूचनांचे पालन करावे तसेच गरज नसताना घराबाहेर पडू नये, असे आवाहन राज्याचे आरोग्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले आहे.जिल्ह्यातील पूर परिस्थिती नियंत्रणात असून प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचेही त्यांनी सांगितले.