येडशी येथील हजरत जमादार बाबा रहे यांचा उरूस उत्साहात साजरा

दर्पण न्यूज धाराशिव प्रतिनिधी (संतोष खुणे) :- धाराशिव तालुक्यातील येडशी येथील हिन्दु मुस्लिम एक्याचे प्रतीक असलेले हजरत जमादार बाबा रहे, यांच्या उरसानिमित्त 11/12/13 आगस्ट पर्यंत विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. धाराशिव तालुक्यातील येडशी येथील हजरत जमादार बाबा रहे यांच्या उरूस निमित्त येडशी येथे विविध धार्मिक कार्यक्रम घेण्यात आले .11 तारखेला पटेल वाड्यातुन सायकाळी 7 वाजता संदल मिरवणूक किला सुरुवात झाली चांदणी चौक बलवड गल्ली ग्रामपंचायत कार्यालय शहाजीराजे चौक मार्गे मिरवणूक हजरत जमादार बाबा दर्गा येथे रात्री दहाला पोहोचली दहा ला फातिया खानीचा कार्यक्रम झाल्यानंतर 12 रोजी चिरागाचा व सुप्रसिद्ध कवाल हैदर नाझा पुणे व महिला कवाल परविन काच वाली भोपाळ याच्यात कवालीचा महा मुकाबला जुना रेल्वे स्टेशन येथे पार पडला यात ग्रामस्थांनी उत्स्फूर्त आसा प्रतिसाद दिला तसेच कार्यक्रमासाठी आलेले कवाल यांचा कमिटीच्या वतीने सत्कार करण्यात आला तसेच आलेल्या सर्व मान्यवरचा देखील यावेळेस सत्कार करण्यात आला तर 13 रोजी जियारत व महाप्रसादा कार्यक्रम पार पडला. तसेच 12 व 13 ऑगस्ट या दोन दिवस रक्तदान शिबिर घेण्यात आले या शिबिरास 55 रक्तदात्यांनी रक्तदान केले रक्तदान केलेल्या रक्तदात्यांना हजरत जमादार बाबा उरुस कमिटीच्या वतीने हेल्मेटचे वाटप करण्यात आले. यावेळी अध्यक्ष रफिक पटेल, उपाअध्यक्ष समीर पटेल आलम सय्यद, खजिनदार हैदर पटेल आशिफ ताबोळी,कोषअध्यक्ष मोसीन शेख ईकबाल शेख,सचिव शाहरुख शेख शहाबाज शेख सोशल मिडिया चे आरिफ ताबोळी, तोफिक पटेल, वाजित ताबोळी,आकीब पटेल, आशिम पठाण,सदाम पिजारी,सुलतान पिजारी, सुलतान पटेल, शाकिब पटेल, साहिल पटेल, याच्या सह ग्रामस्थ उपस्थित होते.