क्रीडामहाराष्ट्रसामाजिक

इचलकरंजीमध्ये केन चेस अकॅडमी आयोजित पहिल्या खुल्या सांघिक अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेत ॲनाकोंडा टीम अजिंक्य केन किंग्ज टीम उपविजेता तर कोल्हापूर वॉरियर्स तृतीय स्थानी

केन किंग्ज टीम उपविजेता तर कोल्हापूर वॉरियर्स तृतीय स्थानी

 

कोल्हापूरः अनिल पाटील

केन इंडिया फाउंडेशन व केन चेस अकॅडमी,इचलकरंजी यांच्या संयुक्त विद्यमाने व श्री स्वकुल साळी समाजाच्या सहकार्याने पहिल्यांदाच इचलकरंजी मध्ये आयोजित केलेल्या केन खुल्या सांघिक अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धा मोठा दिमाखात संपन्न झाल्या. स्पर्धेच्या अंतिम सातव्या फेरीनंतर रवींद्र निकम, उत्कर्ष लोमटे, उमेश कुलकर्णी व श्रीधर तावडे यांचा समावेश असलेल्या अग्रमानांकित ॲनाकोंडा टीमने तेरा गुण मिळवून अजिंक्यपद मिळविले.त्यांना विजेतेपदाचे रोख पाच हजार रुपये व चषक देऊन गौरविण्यात आले. करण दबडे मयुरेश पाटील हेमंत भोसले व आदित्य ठाकूर यांच्या आठवा मानांकित केन किंग टीम ने बारा गुणासह उपविजेतेपदावर मुसंडी मारली. त्यांना द्वितीय क्रमांकाचे रोख तीन हजार रुपये व चषक देऊन सन्मानित केले. आदित्य सावळकर सोहम खासबारदार, प्रणव पाटील व सारंग पाटील यांचा समावेश असलेल्या द्वितीय मानांकित कोल्हापूर वॉरियर्सला अकरा गुणासह तृतीय स्थानावर समाधान मानावे लागले. त्यांना रोख दोन हजार रुपये व चषक देऊन गौरविले.चेस वॉरियर्स चा चौथा क्रमांक आला तर चेकमेट वॉरियर्सला पाचवे स्थान मिळाले. आयसीए नाईट रायडर्स व आयसीए वॉरियर्सला अनुक्रमे सहावे व सातवे स्थान मिळाले. पहिल्या सात क्रमांकांना रोख बक्षीस व चषक देऊन गौरविले.
श्री.स्वकुल साळी समाज सांस्कृतिक हॉल, इचलकरंजी येथे आयोजित केलेल्या या स्पर्धेचे पारितोषिक वितरण रकेन इंडिया फाउंडेशनचे उद्योजक निकुंज बगडिया, व श्री.स्वकुल साळी समाज,इचलकरंजीचे अध्यक्ष रमेश कनोजे, विशाल गिरंगे, रामसागर पोटे व रोहित पोळ यांच्या हस्ते करण्यात आले. इचलकरंजीमध्ये पहिल्यांदाच झालेल्या या सांघिक बुद्धिबळ स्पर्धेत कोल्हापूर सांगली सातारा जयसिंगपूर व स्थानिक इचलकरंजी येथील विक्रमी 56 संघाचे प्रत्येकी चार याप्रमाणे 224 बुद्धिबळपटू सहभागी झाले होते.ही स्पर्धा स्विस लिग पद्धतीने एकूण सात फेऱ्यात झाली.
*उत्तेजनार्थ बक्षीस हे पुढील प्रमाणे*
सर्वोत्तम दहा वर्षाखालील शालेय संघ- गंगामाई हायस्कूल (इचलकरंजी ) .रोख ५०० रु.+
सर्वोत्तम सोळा वर्षाखालील शालेय संघ-
संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल
अतिग्रे.रोख ५०० रु..
सर्वोत्तम महिला संघ-
केन क्वीन्स वॉरियर्स रोख ५०० रु..
सर्वोत्कृष्ट बाल खेळाडू मनस्वी कोळेकर (५ वर्ष पदक देवुन गौरविले.
बोर्ड बक्षिसे खालीलप्रमाणे
बोर्ड क्रमांक १.
तावडे श्रीधर. (सुवर्णपदक)
दबडे करण (रौप्य पदक)
कांबळे संतोष.(कांस्य पदक)
बोर्ड क्रमांक २.
उत्कर्ष लोमटे (सुवर्णपदक)
खासबरदार सोहम (रौप्य पदक)
कुलकर्णी अरीन .(कांस्य पदक)
बोर्ड क्रमांक ३.
आदित्य सावळकर.(सुवर्णपदक)
तन्मय पवार,(रौप्य पदक)
सोनी विवान,(कांस्य पदक)
बोर्ड क्रमांक ४.
पल्ले ज्ञानराज(सुवर्णपदक)
डोळे तनिशकुमार (रौप्य पदक)
निकम रवींद्र(कांस्य पदक).
या सांघिक स्पर्धेसाठी वरिष्ठ राष्ट्रीय पंच करण परीट हे मुख्य पंच म्हणून काम पाहत आहेत त्यांना दीपक वायचळ,रोहित पोळ ,मोहिनीराज डांगे, विजय सलगर व श्रुती कुलकर्णी सहाय्यक पंच म्हणून सहकार्य केले .

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!