सार्वजनिक वाचनालय भिलवडी येथे प्रा. मिलिंद जोशी यांच्याकडून 316 पुस्तके स्नेहपूर्वक भेट

दर्पण न्यूज भिलवडी ;- मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष महाराष्ट्रातील ख्यातनाम वक्ते आणि विचारवंत प्राध्यापक मिलिंद जोशी यांनी सार्वजनिक वाचनालय भिलवडी या महाराष्ट्रातील नामवंत उपक्रमशील वाचनालयास नुकतीच 316 पुस्तके स्नेहपूर्वक भेट दिलेली आहेत.
या पुस्तकांची किंमत सुमारे दीड लाख रुपये एवढी आहे एका विशेष समारंभात वाचनालयाचे कार्यवाह सुभाष कवडे यांनी या पुस्तकांचा स्वीकार केला. यावेळी जेष्ठ संचालक भू.ना. मगदूम सर उपाध्यक्ष डी आर कदम सर संचालक जयंत केळकर सर दिनेश देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना मिलिंद जोशी म्हणाले महाराष्ट्रातील एका उपक्रमशील नामवंत वाचनालयास माझ्या संग्रहाची वाचनीय दर्जेदार पुस्तके भेट देत असताना मला अतिशय आनंद होतो आहे. ग्रामीण भागातील ग्रंथालयात आता वाचन चळवळ खऱ्या अर्थाने ग्रामीण भागात रुजवत आहेत त्यामुळे ग्रामीण भागातील ग्रंथालय विकसित झाली पाहिजेत सुभाष कवडे म्हणाले या ग्रंथ भेटीमुळे भिलवडीचे सार्वजनिक वाचनालय खऱ्या अर्थाने समृद्ध वाचनालय बनलेले आहे. मिलिंद जोशी सरांच्या या सुंदर ग्रंथ भेटीने वाचनालयाचे ग्रंथधन अधिकच समृद्ध बनलेले आहे. असे सांगून त्यांनी मिलिंद जोशी सरांचे खास आभार मानले या ग्रंथ भेटीमुळे भिलवडी आणि परिसरातून वाचन प्रेमी मिलिंद जोशी सरांचे विशेष अभिनंदन करीत आहेत