महाराष्ट्र

अहमदनगर जिल्हा डिजिटल मीडिया संपादक, पत्रकार संघटनेच्या अध्यक्षपदी सूभाष चिंधे यांची निवङ

सचिवपदी राजेंद्र वाडेकर, शहराध्यक्षपदी संतोष आवारे

 

कोल्हापूरः अनिल पाटील

डिजिटल मीडिया संपादक, पत्रकार संघटनेच्या अहमदनगर जिल्हाध्यक्षपदी दैनिक स्वतंत्रचे संपादक सुभाष चिंधे, सचिव राजेंद्र वाडेकर तर नगर शहराध्यक्षपदी संतोष आवारे यांच्या निवडीची घोषणा संघटनेचे संस्थापक, अध्यक्ष राजा माने यांनी केली.
शहरातील हॉटेल फरहत येथील हॉलमध्ये डिजिटल मीडिया संपादक, पत्रकार संघटनेचे अध्यक्ष राजा माने यांच्या अध्यक्षतेखाली शहरासह जिल्ह्यातील डिजिटल मीडिया संपादक, पत्रकारांची बैठक पार पडली. यावेळी ज्येेष्ठ पत्रकार राजेंद्र वाडेकर, बाबा जाधव, मकरंद घोडके, इकबाल शेख, विजय सांगळे, जितेंद्र गांधी, दैनिक स्वतंत्रचे कार्यकारी संपादक सुभाष मुदळ, मनोज सातपुते, लेटस्अपचे प्रवीण सुरवसे, अमोल भिंगारदिवे, श्रीकांत खांदवे, सागर गोरखे, प्रशांत शिंदे, नगर घडामोडीचे सागर तनपुरे, विक्रम लोखंडे, ग्लोबल न्यूजचे गिरीश रासकर, सोनाली गांधी, आयलव्ह नगरचे एम. शेख, एनटीव्हीचे शब्बीर सय्यद, दिव्य मराठीचे उदय जोशी, सरकारनामाचे गणेश ठोंबरे, सौ. प्रियंका शेळके-बोबडे, शुभम पाचारणे आदी उपस्थित होते. यावेळी माने यांनी संघटनेच्या विकासात्मक कामाचा लेखाजोखा सर्वांसमोर मांडला. काम करताना प्रथम आपल्या आरोग्याची, कुटुंबाची काळजी घ्यावी. संघटनेच्या माध्यमातून काम करायचे असल्यास कोणावर बंधन नाही, मनाने संघटनेचे कार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

कार्यकारिणी अशी!
जिल्हाध्यक्ष सुभाष चिंधे, सचिव राजेंद्र वाडेकर-(राहुरी), कार्याध्यक्ष गुरुप्रसाद देशपांडे (नेवासा), उपाध्यक्ष मेट्रो वाहिनीचे संपादक मकरंद घोडके (खजिनदार), लियाकत शेख (जामखेड), आकर्षणचे संपादक विजय सांगळे (अहमदनगर), सहसचिव अहमदनगर लाईव्हचे तेजस शेलार (अहमदनगर), कार्यकारिणी सदस्य एन टीव्हीचे संपादक इकबाल शेख (अहमदनगर), दैनिक सार्वभौमचे संपादक सागर शिंदे (अकोले), विजयमार्गचे संपादक अतुल लहारे (अकोले), सय्यद अन्सार (अहमदनगर). नगर शहराध्यक्ष लोकशाही टीव्हीचे प्रतिनिधी संतोष आवारे, उपाध्यक्षपदी प्रियंका शेळके-बोबडे, शुभम पाचारणे, सौरभ गायकवाड.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!