करनुर येथे विनोद कांबळे यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनी अभिवादन

दर्पण न्यूज कागल तालुका प्रतिनिधी (मारूती डी कांबळे) :- करनुर ता.कागल ज्यांनी आयुष्य आंबेडकरी समाजाच्या चळवळीसाठी दिले असे आंबेडकरी चळवळीतील बुलंद आवाज विनोद कांबळे आपल्यातून जाऊन एक वर्ष झाले… विनोद च व्यक्तीमत्व तसेच त्यांच्या संयम, सौजन्य आणि आत्मविश्वास यामुळे निर्माण झालेली उर्जा नियतीने आपल्याकडून हिरावून घेतली. गेले वर्षभर प्रत्येक सामाजिक आणि राजकीय कार्यक्रमात वावरताना त्यांच्या अनुपस्थितीची जाणिव सलत होती.
आज विनोद कांबळे यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त करनुर येथे जाऊन जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे दादा यांनी विनोद कांबळे यांच्या प्रतिमेला वंदन केले आणि श्रद्धांजली वाहिली. श्रद्धांजली वाहत असताना त्यांच्या कुटुंबीयांसोबत मागील जुन्या आठवणींना उजाळा दिला, यावेळी त्यांना देखील गहीवरू आले .अशी व्यक्ती कधी झाली नाही आणि भविष्यामध्ये कधीही होणार नाही असे ते म्हणाले….!
यावेळी रिपब्लिकन पक्षाचे प्रमुख पदाधिकारी तसेच कांबळे कुटुंबिय आणि विनोद वर प्रेम करणारे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.