घोडेगाव येथे जागतिक आदिवासी दिनानिमित्त प्रकल्प अधिकारी प्रदीप देसाई यांच्या हस्ते पत्रकार स्नेहा मडावी यांचा सत्कार

दर्पण न्यूज आंबेगाव :- आदिवासी विकास प्रकल्प घोडेगाव, आंबेगाव सांस्कृतिक उत्सव समिती आणि केंद्रीय दूरसंचार ब्युरो, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने घोडेगाव येथे जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात हजारो आदिवासी बांधवांनी उत्स्फूर्तपणे सहभाग मुख्य कार्यक्रम घोडेगाव येथील वनमाला मंगल कार्यालयात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बुधाजी डामसे होते. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून राज्यमंत्री दर्जा असलेले म्हाडाचे शिवाजीराव अढळराव पाटील, आंबेगावचे आमदार . दिलीपराव वळसे पाटील, देवदत्त निकम साहेब, आदिवाशी पारधी समाजाचे समाजसेवक साहित्यिक नामदेव भोसले साहेब उपस्थित होते. या मान्यवरांनी आपल्या मनोगतातून आदिवासी समाजाच्या प्रगतीसाठी सुरू असलेल्या योजनांवर प्रकाश टाकला आणि आदिवासी बांधवांना शुभेच्छा दिल्या. प्रमुख वक्ते प्रा. हनुमंत भावरी यांनी आदिवासी विकासाबाबत मार्गदर्शन केले पत्रकार स्नेहा उत्तम मडावी यांचा सत्कार घोडेगावचे प्रकल्प अधिकारी पुणे प्रदीप देसाई यांच्या हस्ते करण्यात आला पत्रकार उपस्तित होते .कार्यक्रमात उपस्थित जनसमुदायाला आदिवासी विकासाच्या विविध योजनांच्या यशोगाथा स्क्रीनवर दाखवण्यात आल्या. या यशोगाथांनी उपस्थितांना प्रेरणा मिळाली. या कार्यक्रमाचे आणखी एक विशेष आकर्षण म्हणजे महाराष्ट्र शासनाने नागपूर येथे सुरू केलेल्या ‘राणी दुर्गावती आदिवासी महिला सक्षमीकरण योजना’चा शुभारंभ सोहळा थेट स्क्रीनवर दाखवण्यात आला. या थेट प्रक्षेपणाने उपस्थितांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोहन नंदकर यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक काळुराम भावरी यांनी केले. या कार्यक्रमाला प्रकल्प अधिकारी . प्रदीप देसाई, दुरसंचर विभागाचे फॅनिकुमार साहेब किरण गाभाले साहेब, सुभाष मोरमारे यांच्यासह शासकीय कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी विविध समाजांतील संघटनांचे प्रतिनिधी आणि आर्दश माता शेवराबाई ज्ञानदेव भोसले लेखक भास्कर भोसले ऋतुजारांनी भोसले सुजाता भोसले सुरेखा भोसले सुजाता भोसले ग्रिष्म तुकाराम भोसले तुकाराम भोसले पत्रकार सुनिल ज्ञानदेव भोसले सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा कार्यक्रम आदिवासी संस्कृतीचा गौरव आणि समाजाच्या विकासाची दिशा दर्शवणारा ठरला.