क्राईममहाराष्ट्र
धाराशिव पोलिस कर्मचारी श्रीराम कांबळे यांचा कर्तव्यावर असताना अपघातात मृत्यू


दर्पण न्यूज धाराशिव प्रतिनिधी (संतोष खुणे )::- दि.०७ऑगस्ट :Hc/661 श्रीराम इराप्पा कांबळे, पोलीस मुख्यालय धाराशिव येथे कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी नाईट पेट्रोलिंग दरम्यान कर्तव्यावर असताना अपघातात मयत पावल्याची दु:खद घटना घडली आहे. ही घटना येरमाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरखळी-वडगाव मार्गावर रात्रीच्या सुमारास घडली.
अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी प्राथमिक माहितीनुसार रात्री गस्त घालत असताना अचानक घडलेल्या या अपघातामुळे पोलीस दलात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. श्रीराम कांबळे हे कर्तव्यनिष्ठ व शांत स्वभावाचे कर्मचारी म्हणून ओळखले जात होते.
घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली असून पुढील तपास येरमाळा पोलीस करत आहेत.


