श्रावस्ती बुद्ध विहार ममदापूर येथे ज्येष्ठ पौर्णिमा उत्साहात साजरी

दर्पण न्यूज कागल तालुका प्रतिनिधी (मारूती डी कांबळे) -:
श्रावस्ती बुद्ध विहार ममदापूर येथे उस्ताहात ज्येष्ठ पौर्णिमा साजरी करण्यात आली.
बुद्ध संस्कृती मध्ये पौर्णिमा यांना अत्यंत महत्व आहे.आजच्या काळात बुद्ध तत्वज्ञानाची अधिक नितांत गरज जाणवते.संपूर्ण प्राणी समूहाचे होवून कल्याण होण्याकरिता सर्वा प्रती मंगल मैत्री ही करुनेच्या भावनेने आली असता जगा मध्ये बंधुता साधली जावून विश्व कल्याण होईल.मंगल मैत्री व मानवता हा बुद्ध तत्वज्ञानाचा आधार असल्याचे विचार राहूल शितोळे यांनी व्यक्त केले.ते पुढे म्हणाले या पौर्णिमेच्या दिवशी सम्राट अशोक यांना निग्रोध यांनी धमोपदेश केला ब्रह्मदेशातील सुवर्ण 154 मी उंचीच्या स्तूपाची निर्मिती करण्यात आली आहे.त्याच प्रमाणे महेंद्र यांनी बुद्ध गया येथील बोधी वृक्षाची एक फांदी तोडून ती श्रीलंका येथे लावली.म्हणून या पौर्णिमेला फार महत्व आहे.परिसरातील विहरमध्ये रविवारी सर्व जन एकत्र येऊन पंचशील ग्रहण करून या पुढील काळात प्रबुद्ध भारताच्या निर्मिती करीता तरुण पिढी नी निर्णायक भूमिका घ्यवी असे आवाहन केले.विविध कार्यक्रम घेवून त्याच प्रमाणे खीर दान करून कार्यक्रम संपन्न झाला.