बोरगावच्या सेंट्रिग कॉन्ट्रॅक्टराची विष प्राशनाने आत्महत्या

बोरगांव /प्रतिनिधी
बोरगाव येथील सेंट्रींग कॉन्ट्रॅक्टराने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना सोमवार सकाळी बोरगाववाडी-कारदगा रस्त्यावर असलेल्या स्वामी मळा ओढ्यात निदर्शनास आली.रमेश राजाराम चौगुले (वय 38) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे.
याबाबत घटनास्थळावरून पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, मृत रमेश हा बोरगाव व परिसरात एक नामवंत सेंट्रिंग कॉन्ट्रॅक्टर म्हणून प्रचलित होता.त्यामुळे परिसरातील सुमारे पन्नासहून अधिक कामगारांना त्याने आपल्याकडे सेंट्रींग कामकरिता ठेवल्याने त्यांचा उदरनिर्वाह हि तो करत होता.कामगारांना मदत करण्याबरोबर स्वतः कष्ट करत,जिद्दीने आपला संसार त्याने उभारला होता.अत्यंत मन मिळावू स्व-भावाचा रमेश हा शुक्रवार रात्री पासून घरातून बाहेर पडला होता.त्याचा शोधाशोध करूनही शोध लागत नसल्याने आज त्यांच्या कुटुंबीयांनी जवळच्या सदलगा पोलीस ठाण्यात याबाबत फिर्याद नोंदवत असता,याच दरम्यान बोरगाववाडी – कारदगा रस्त्यावरील स्वामी मळा ओढ्यात अनोळखी मृतदेह आढळल्याची पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन शहनिषा करताच,मृताच्या खिशातून मिळालेल्या कागदपत्रावरून सदरचा मृतदेह हा बोरगावच्या रमेशचाच असल्याचे निदर्शनास आले. घटनेची माहिती मिळताच नातेवाइकांसह,बोरगाव परिसरातील सेंट्रींग कामगार व मित्र मंडळींनी घटनास्थळी धाव घेऊन गर्दी केली होती.अचानकपणे रमेशने हा निर्णय घेतल्याने त्यांचा कुटुंबीयांना मोठा धक्का बसल्याने घटनास्थळी चौगुले कुटुंबीयांनी केलेला आक्रोश हृदय पिळून टाकणारा होता.
संकटकाळी मदतीचा हात देणारा शिवाय घरची कौटुंबिक आर्थिक परिस्थिती चांगली असतानाहि या तरुणाच्या आत्महत्येचे नेमके कारण न-समजल्याने आत्महत्येचे कारण गुलदस्त्यात आहे.
सदलगा पोलीस उपनिरीक्षक एच.भरतगौडा यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला व शवाविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला.
रमेश यांची पत्नी योगिता चौगुले यांनी सदलगा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून त्यांच्या पश्चात आई,भाऊ ,पत्नी,मुलगा,दोन मुली, भावजेय असा परिवार आहे.त्यांच्या निधनाने भागात हळहळ व्यक्त होत आहे.