माजी सहकार मंत्री तथा आमदार डॉ विश्वजीत कदम यांच्या कडून महापूरासाठी यांत्रिक बोटी सज्ज
लोकांना सुरक्षित स्थळी येण्यासाठी सात बोटीचा औंदूबर येथे सराव; मागेल त्यांना बोटी मिळणार

भिलवडी; सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील भिलवडी आणि परिसरातील लोकांना महापूरचा तडाका बसतो, याचा विचार करून माजी सहकार मंत्री तथा आमदार डॉ विश्वजीत कदम यांनी मार्गदर्शनाखाली औदुंबर येथे यांत्रिक बोटी सज्ज ठेवण्यात आलेल्या आहेत. लोकांना सुरक्षित स्थळी येण्यासाठी सात बोटीचा सराव तज्ञ लोकांकडून प्रशिक्षण दिले जात आहे. तसेच ज्या गावांमध्ये पूर परिस्थिती लक्षात घेऊन मागेल त्यांना बोटी मिळणार आहेत.
नेहमीच आमदार डॉ विश्वजीत कदम यांचा महापूर काळात ज्यांना मदत पाहिजे त्यांना मदत करण्याचा पुढाकार असतो, शासन आणि आपल्या संस्थेच्या माध्यमातून लोकांना सर्व प्रकारची ते मदत आणि सहकार्य करीत असतात. औंदूबर येथे शुक्रवारी आमदार डॉ विश्वजीत कदम यांनी परदेशातून आणलेल्या तांत्रिक बोटींचं लोकांच्या सेवेसाठी शुभारंभ करण्यात आले तर तज्ञ लोकांकडून प्रशिक्षण देण्यात आले.
आता ज्या गावांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली की तेथे या बोटी तैनात करण्यात येणार आहेत.या बोटींच्या शुभारंभ प्रसंगी
अंकलखोप विकास सोसायटीची माजी चेअरमन बाळासाहेब मगदूम, पुरुषोत्तम जोशी, अरविंद सूर्यवंशी, प्रदीप पाटील, पृथ्वीराज पाटील, शिवलिंग चौगुले,गौरव पाटील तसेच औदुंबर देवस्थान ट्रस्टचे पदाधिकारी, पत्रकार बांधव उपस्थित होते.दरम्यान, सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक तथा रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष महेंद्र आप्पा लाड यांनीही औंदूबर येथे तांत्रिक बोटींच्या सराव ठिकाणी भेट दिली. तसेच बोटूमधून कृष्णा नदी पात्रातून फेरफटका माराला.
यावेळी महेंद्र आप्पा लाड यांनीही आमदार डॉ विश्वजीत कदम यांनी या बोटी लोकांच्या सेवेसाठी ठेवलेल्या आहेत. याचा योग्य वापर करून लोकांची आपण सेवा करूया असे सांगितले.
भिलवडी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक भगवान पालवे यांनी ही यांत्रिक बोटी चा अनुभव घेतला.