ग्रामीणमहाराष्ट्रसामाजिक

नांद्रे येथे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी

एम.एम.ग्रुपचे सदस्य प्रदीप मदने यांचे मार्गदर्शन ; लोकांचा मोठा सहभाग

 

दर्पण न्यूज भिलवडी :-
साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची 105 वी जयंती नांद्रे ता.मिरज येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली

मराठी साहित्य आणि दलित चळवळीतील अग्रगण्य व्यक्तिमत्त्व असलेल्या अण्णा भाऊ साठे यांच्या स्मरणार्थ विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि साहित्यिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी एम.एम.ग्रुपचे सदस्य प्रदीप मदने म्हणाले. औपचारिक शिक्षणाचा अभाव असतानाही त्यांनी 35 कादंबर्‍या, 19 कथासंग्रह, 14 लोकनाट्ये आणि 19 पोवाडे लिहून मराठी साहित्यात अढळ स्थान निर्माण केले. त्यांच्या ‘फकिरा’ कादंबरीला राज्य सरकारचा उत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार मिळाला, तर ‘माझी मैना’ हे गीत आजही लोकप्रिय आहे. संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि सामाजिक परिवर्तनासाठी त्यांनी आपल्या शाहिरीद्वारे जनजागृती केली.यामुळे त्याचे विचार घराघरात रुजणे आज काळाची गरज आहे अशा भावना प्रदीप मदने यांनी व्यक्त केल्या
यावेळी माजी ग्रा.प.सदस्य अरविंद कुरणे म्हणाले जात हे वास्तव आहे, गरिबी ही कृत्रिम आहे, गरिबी नष्ट करता येऊ शकते,” असा त्यांचा संदेश आजही प्रेरणादायी ठरतो.
अण्णाभाऊंचे साहित्य जो कुणी आत्मसात करेल तो ज्ञानाने भरून जाईल अशी माहिती करणे यांनी दिली
नांद्रे येथे सकाळी अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.सोशल मीडियावरही अण्णा भाऊंच्या विचारांचा जागर होत आहे.अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या साहित्याचा आणि विचारांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प अनेकांनी व्यक्त केला.
यावेळी एम.एम. ग्रुप कोअर कमिटी सदस्य प्रदीप मदने, मा.ग्रा.सदस्य अरविंद कुरणे,ग्रा.प.सदस्य दिलीप मदने, सतीश मदने, हेमंत तोडकर, सकलेन मुजावर,आयाज मुजावर, विक्रम मोहिते, गणेश माने,परशुराम कांबळे, गणेश मदने, सिद्धार्थ ढाले, नागेश कुरणे आदी उपस्थित होते

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!