पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा 28 रोजी सांगली जिल्हा दौरा

दर्पण न्यूज सांगली : राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे सोमवार, दिनांक 28 जुलै 2025 रोजी सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांच्या दौऱ्याचा सविस्तर कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
सोमवार, दिनांक 28 जुलै रोजी सकाळी 5.35 वाजता मिरज रेल्वे स्थानक येथे महालक्ष्मी एक्सप्रेसने आगमन व शासकीय विश्रामगृह मिरजकडे प्रयाण. सकाळी 6 वाजता शासकीय विश्रामगृह मिरज येथे आगमन व राखीव. सकाळी 7.15 वाजता शासकीय विश्रामगृह मिरज येथून कवठेमहांकाळकडे प्रयाण. सकाळी 8 वाजता गावभाग कवठेमहांकाळ येथे आगमन व श्री. रणजित रमेश घाटगे, नगराध्यक्ष यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट. सकाळी 9 वाजता गावभाग, कवठेमहांकाळ येथून नांगोळे, ता. कवठेमहांकाळकडे प्रयाण. सकाळी 9.15 वाजता नांगोळे पट्टा ता. कवठेमहांकाळ येथे आगमन व राजमाता बैलगाडी शर्यत संघ महाराष्ट्र राज्य आयोजित राज्यस्तरीय बैलगाडी भव्य शर्यती 2025 – देवाभाऊकेसरी, शालेय वह्या वितरण व मुख्यमंत्री सहाय्यता निधीत योगदान कार्यक्रमास उपस्थिती. सकाळी 10 वाजता नांगोळ पट्टा येथून उमदी, ता. जतकडे प्रयाण. सकाळी 11.45 वाजता उमदी पोलिस स्टेशन उमदी येथे आगमन व जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन 2024-25 अंतर्गत जत तालुक्यातील उमदी पोलीस स्टेशन येथील निवासी इमारत बांधकाम भूमिपूजन कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 12.45 वाजता उमदी येथून जाडरबोबलाद ता. जतकडे प्रयाण. दुपारी 1.15 वाजता प्राथमिक आरोग्य केंद्र जाडरबोबलाद येथे आगमन व प्राथमिक आरोग्य केंद्र जाडरबोबलादचे लोकार्पण सोहळ्यास उपस्थिती. दुपारी 1.45 वाजता जाडरबोबलाद येथून जतकडे प्रयाण. दुपारी 2.30 वाजता ताडमळा, आचकनहल्ली रोड जत येथे विक्रम ताड यांच्या निवासस्थानी आगमन व राखीव. दुपारी 3 वाजता वनपरिक्षेत्र कार्यालय जत प्रांगण, जत येथे वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय जतच्या नवीन इमारत व वनपाल जत यांच्या निवासस्थान नवीन इमारतीच्या उद्घाटन सोहळ्यास उपस्थिती. दुपारी 3.30 वाजता जत नगरपरिषद जत येथील महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान अभियानांतर्गत जत शहराच्या पाणी पुरवठा योजनेच्या भूमिपूजन सोहळ्यास उपस्थिती, स्थळ – जत नगरपरिषद, जलशुध्दीकरण केंद्र जत. सायंकाळी 4.45 वाजता जत येथून खानापूरकडे प्रयाण. सायंकाळी 6 वाजता शिवाजी विद्यापीठ उपकेंद्र, जनचळवळ समिती व भाजपा खानापूर तालुका यांच्या वतीने आयोजित शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरच्या खानापूर उपकेंद्र मंजुरीबाबत जाहीर नागरी सत्कार सोहळ्यास उपस्थिती, स्थळ – श्री राम मंदिर चौक, खानापूर. सायंकाळी 7.15 वाजता खानापूर येथून विटाकडे प्रयाण. सायंकाळी 7.30 वाजता विवेकानंद नगर ढवळेश्वर तलाव रोड विटा येथे आगमन व मयुरेश विवेक गुळवणी यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट. सायंकाळी 7.55 वाजता सुशांत पवार, सरपंच, साळशिंगे यांच्या कार्यालयास सदिच्छा भेट, स्थळ – श्रीनाथ फायनान्स, मायणी रोड, विटा. रात्री 8.15 वाजता ॲड. वैभव सदाशिवराव पाटील यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट, स्थळ – पुण्याई यशवंतनगर, विटा. रात्री 8.45 वाजता आमदार सुहास बाबर यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट, स्थळ – मॉडर्न एज्युकेशन सोसायटी समोर, बँक ऑफ इंडिया जवळ, महावीर नगर, विटा. रात्री 9.15 वाजता किशोर प्रकाश डोंबे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट, स्थळ – मोरयो बंगलो, कराड रोड, संभाजीनगर शहा पेट्रोल पंपासमोर विटा. रात्री 10 वाजता विटा येथून कराड रेल्वे स्थानकाकडे प्रयाण.