आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्रसामाजिक
महापालिका कर्मचारी वैशाली कांबळे यांनी लोकल सेल्फ गव्हर्मेंट डिप्लोमा परीक्षेमध्ये भारतात पहिला क्रमांक पटकवला ; महापालिका आयुक्त सत्यम गांधी यांच्याहस्ते सत्कार

महापालिका कर्मचारी सौ. वैशाली कांबळे यांनी लोकल सेल्फ गव्हर्मेंट डिप्लोमा परीक्षेमध्ये भारतात पहिला क्रमांक पटकवला आहे यानिमित्ताने महापालिका आयुक्त सत्यम गांधी यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.
लोकल सेल्फ गव्हर्मेंट डिप्लोमा परीक्षेमध्ये भारतात पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या सांगली महापालिकेच्या कर्मचारी सौ. वैशाली संदीप कांबळे यांचे महापालिका आयुक्त सत्यम गांधी यांनी सत्कार करीत कौतुक केले.
सौ. वैशाली कांबळे या महापालिकेच्या जन्ममृत्यू विभाग सांगलीत संगणक चालक म्हणून कार्यरत आहेत. सेल्फ गव्हर्मेंट डिप्लो यावेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, उप आयुक्त स्मृती पाटील ,विजया यादव , अश्विनी पाटील ,निखिल जाधव सर्व खाते प्रमुख उपस्थित होते.