कुंभारगाव येथे उद्यानविद्या दूतांचे स्वागत

दर्पण न्यूज कडेगाव : तालुक्यातील कुंभारगाव
येथे भारती विद्यापीठाचे
उद्यानविद्या
महाविद्यालय
सोनसळ-हिंगणगाव मधील
उद्यानविद्या दुतांचे ग्रामीण उद्यानविद्या कार्यानुभव कार्यक्रम आणि उद्यानविद्या औद्योगिक जोड-२०२५-२६ हा कार्यक्रम राबविण्यासाठी आगमन झाले. प्राचार्य डॉ. ए. डी. जाधव. उपप्राचार्य डॉ. वाय. एस. जाधव (प्रशासन), डॉ. आर. एम. पवार (शिक्षण), अकॅडमिक इन्चार्ज प्रा. डॉ. व्ही. आर. घार्गे आणि समन्वयक व कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. रोहित उ. पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम होत आहे. विद्यार्थी शेतकऱ्यांना शेतीविषयक माहिती, नवीन तंत्रज्ञान याबाबत माहिती देऊन गावामध्ये शेतीविषयक
कार्यक्रम,
विविध उपक्रम व कार्यक्रम राबविणार आहेत. माती परीक्षण, फळबाग लागवड, वृक्षारोपण, एकात्मिक कीड रोग, बीज प्रक्रिया, फळे व भाजीपाला प्रक्रिया, आधुनिक शेती औजारे वापर, शेतीचा आर्थिक फायदा, जनावरांचे लसीकरण आदीबाबत उपस्थित गावकरी व शेतकऱ्यांशी संवाद साधणार असल्याचे उद्यानविद्या दूत राजरत्न आखाडे यांनी सांगितले. यावेळी ओंकार अंबुरे, हर्ष चव्हाण, श्रीशैल चव्हाण, आशिष देशमुख हे उद्यानविद्यादूत उपस्थित होते. या दुतांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन सरपंच पतंगराव कुंभार यांनी दिले. यावेळी उपसरपंच बापूराव लाड, सर्व ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी, ग्रामसेवक मिलिंद आपटे, ग्रामस्थ व शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.