महाराष्ट्र
भ्रष्टाचार विरोधी जनआक्रोशच्या पश्चिम महाराष्ट्र उप कार्याध्यक्ष पदी संजय कांबळे यांची नियुक्ती

सांगली ; वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन सांगली संपर्कप्रमुख मा. संजय भूपाल कांबळे यांनी गोरगरीब कष्टकरी कामगारांना न्याय हक्क मिळवून देण्यासाठी शासन दरबारी लढा उभा करून बांधकाम कामगारांच्या हितासाठी न्यायालयीन लढायची तयारी सुरू केली यांची दखल घेवून, भ्रष्टाचार विरोधी जनआक्रोश, महाराष्ट्र राज्य, संस्थापक अध्यक्ष मा.भाऊसाहेब रघुनाथ कांबळे यांनी, फुले शाहू आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते, कामगारांच्या न्याय हक्कासाठी सदैव तत्पर असणारे, मा. संजय भूपाल कांबळे यांची, भ्रष्टाचार विरोधी जनआक्रोश, महाराष्ट्र राज्य , भारत सरकार मान्यताप्राप्त राज्यव्यापी सामाजिक संघटना मध्ये पश्चिम महाराष्ट्र उप कार्याध्यक्ष पदी योग्य निवड करण्यात आली आहे.
याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून
पुढील सामाजिक वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.