भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर व महापुरुषांची संयुक्त्त जयंती मंत्रालयात मोठ्या उत्साहात

दर्पण न्यूज धाराशिव प्रतिनिधी (संतोष खुणे) ;
अनु. जाती/जमाती / विजाभज/इ.मा.व./वि.मा.प्र. शासकीय / निमशासकीय अधिकारी कर्मचारी / अधिकारी संघटना व महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, मंत्रालय, मुंबई या संघटनेच्या विद्यमाने त्रिमुर्ती प्रांगण मंत्रालय, मुंबई येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त दि. २७ मे, २०२५ रोजी दुपारी ०४.३० वाजता मंत्रालयातील परिषद सभागृहात छ.शिवाजी महाराज, क्रांतीसुर्य ज्योतिबा फुले व विश्वभुषण डॉ.बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या संयुक्त जयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रम प्रसंगी ज्येष्ठ विचारवंत, साहित्यिक व इतिहास अभ्यासक मा.डॉ.श्रीमंत कोकाटे यांचे प्रबोधनात्मक व्याख्यान आयोजित करण्यात आला आहे.
मंत्रालयामध्ये आयोजित महापुरुषांच्या संयुक्त जयंती कार्यक्रम प्रसंगी मा.ना.श्री.संजय सावकारे, मंत्री (वस्त्रोद्योग), महाराष्ट्र राज्य हे उपस्थित होते. तसेच महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिव श्रीमती सुजाता सौनिक व सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव मा.डॉ.हर्षदिप कांबळे, दैनिक सम्राटच्या संपादिका निलिमा बबन कांबळे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. तसेच राज्याच्या मुख्य सचिव श्रीमती सुजाता सौनिक यांनी मार्गदर्शन करुन शुभेच्छा दिल्यात.
या कार्यक्रमास उपस्थित असलेले मंत्रीमहोदय मा.ना.श्री.संजय सावकारे यांनी आज आपण जे काही आहोत ते केवळ बाबासाहेबांमुळेच आहोत असे सांगून संघटनेच्या विविध मागण्यासंदर्भात मा.मुख्यमंत्रीमहोदय व शासनाकडे पाठपूरावा करण्यासाठी संघटनेच्या पाठीशी ठाम उभा असल्याचे महत्वपूर्ण वक्तव्य केले.
प्रमुख व्याख्याते मा.डॉ.श्रीमंत कोकाटे यांनी आपल्या व्याख्यानात सर्व महापुरुष यांनी आपआपल्या काळात जाती, धर्म, पंथ, प्रांत व लिंग या पलीकडे जाऊन मानव जातीच्या प्रगतीसाठी सामाजिक समता प्रस्थापित करण्याचे ऐतिहासिक कार्य केले असल्याचे प्रतिपादन केले.
मा.डॉ.हर्षदिप कांबळे, प्रधान सचिव यांनी महापुरुषांची विचारधारा आजच्या पिढीने पुढील पिढीपर्यंत पोहचविण्याची नैतिक जबाबदारी असून तरुण पिढीला जागृत करण्यासाठी चळवळीसाठी दान पारमिता बाळगण्याची गरज असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.
तसेच दैनिक सम्राटच्या संपादिका निलिमा बबन कांबळे यांनी तरुण पिढीला नशेच्या आहारी जाण्यापासून वाचविण्याचे आव्हान आपल्या समोर असल्याचे सांगून समाजाने अंधश्रध्देपासून दूर राहण्याचे वक्तव्य त्यांनी केले.
त्याचप्रमाणे संघटनेचे अध्यक्ष मा.भारत वानखेडे यांनी मागासवर्गीय अधिकारी/ कर्मचारी यांचे पदोन्नतीतील आरक्षण पूर्ववत सुरु करणेबाबत व अधिकारी कर्मचाऱ्यांच्या अन्य प्रश्नांबाबत मा.मंत्रिमहोदय श्री.संजय सावकारे यांच्या माध्यमातून शासनाकडे पाठपूरावा करण्यात येईल किंवा प्रसंगी सनदशीर मार्गाने संघर्ष सुध्दा केला जाईल अशी ग्वाही दिली.
याप्रसंगी संघटनेचे मुख्य मार्गदर्शक मा.श्री. लक्ष्मीकांत ढोके, सहसचिव, उद्योग, उर्जा व कामगार विभाग, श्री.अंबादास चंदनशिवे, उप सचिव, कृषि विभाग व स्वागताध्यक्ष जयंती उत्सव समिती, डॉ. सुदिन गायकवाड, सह सचिव, जलसंपदा विभाग, श्री.अशोक आत्राम, सह सचिव, श्री.दिनेश डिंगळे, सह सचिव, श्री भास्कर बनसोडे, अवर सचिव (से.नि.), श्री. सुबोध भारत, स्वीय सहाय्यक, मंत्री, पर्यटन, श्री. विजय नांदेकर, कक्ष अधिकारी, श्री.बा.ई. सावंत, अवर सचिव, श्री.सी.आर. निखारे, कक्ष अधिकारी, महसूल व वन विभाग, श्री सुभाष गवई, अध्यक्ष जयंती उत्सव समिती, राज्य महासचिव डॉ.उत्तमराव सोनकांबळे, श्रीमती सविता शिंदे, स्वीय सहाय्यक, सिडको- महिला आघाडी प्रमुख, श्री.राजेंद्र सवने, उप सचिव (से.नि.), श्री.बनकर, सह सचिव (से.नि.) , श्री.वैभव काळखैर, मंत्रालय संघटक श्री.राज श्रॉफ, दिपाली सहारे, राजेंद्र धावारे, स्तंभलेखक दादाभाऊ अभंग, सुप्रसिध्द गायक विष्णु शिंदे, श्रीमती निलिमा मेश्राम, श्री.बाबुसिंग राठोड, श्री.सोनु वाडकर, श्री.गजानन सारुक्ते, पंकज सावदेकर, डॉ.कृष्णामुर्ती, प्रा.भार्गव बोलके, इजि.अभय यादव, इंजि.करण पांचाळ, मिथील रणपिसे, ॲङ पंचशिला बडेकर, आदित्य वानखेडे, चे.रा.साळवी, श्री.तांदळे (प्रसिध्दी), करण माळवे, पत्रकार, सकाळ, सुरेंद्र सोनकांबळे, स्वीय सहाय्यक स्नेहा कुटे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
मंत्रालयामध्ये महापुरुषांच्या जयंतीसारखा प्रबोधनात्मक कार्यक्रमाच्या आयोजनासाठी मंत्रालयातील अधिकारी/ कर्मचारी यांनी समाधान व्यक्त केले. तसेच कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी संघटनेचे सर्व पदाधिकारी /कर्मचारी यांनी विशेष प्रयत्न केलेत. कार्यक्रमाचे यथोचित सूत्रसंचालन श्री.संतोष साखरे यांनी केले. कार्यक्रमाचे छायाचित्रण व प्रसारण श्री.प्रदिप ननावरे व आकाश आठवले, अमित गायकवाड व मनोहर अहिरे यांनी केले.