आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्रराजकीयसामाजिक
सामाजिक न्याय विभागाच्या दोन वसतिगृहांच्या नूतन इमारतींचे रविवारी सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते होणार उद्घाटन

दर्पण न्यूज सांगली : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागांतर्गत सांगली व मिरज येथीस मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या दोन वसतिगृहांचे रविवार, दि. 1 जून रोजी सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.
गुणवंत मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, मिरज तसेच 125 वी जयंती मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, सांगली या दोन वसतिगृहांच्या नूतन इमारतींचे आज लोकार्पण होणार असून, या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, प्रमुख शासकीय अधिकारी व अन्य मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे. रमा उद्यान, मेडिकल कॉलेज ग्राऊंडजवळ, शेजारी, मिरज येथे रविवार, 1 जून 2025 रोजी, दुपारी 1 वाजता हा कार्यक्रम होणार आहे.