स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी काळ आणि वेळेचे भान आवश्यक : प्रा.गणेश शिंदे
भिलवडी शिक्षण संस्थेच्या माजी अध्यक्षा व थोर समाजसेविका स्व.डॉ.चंद्राताई शेणोलीकर यांचा २९ वा स्मृतिदिनानिमित अभिवादन कार्यक्रम

भिलवडी :
गुणपत्रिकेतील गुणांची सूज म्हणजे गुणवत्ता नाही.आपल्या वाट्यास आलेल्या परिस्थितीचे भांडवल न करता प्रत्येक गोष्टीची चिकित्सा करायला शिका. काळ आणि वेळ कमालीचा बदलत आहे,परिस्थितीच भान ठेऊन बदलत्या काळानुसार बदलायला शिकाल तरच स्पर्धेच्या युगात टिकाल असे प्रतिपादन प्रसिद्ध वक्ते प्रा.गणेश शिंदे यांनी केले.
भिलवडी शिक्षण संस्थेच्या माजी अध्यक्षा व थोर समाजसेविका स्व.डॉ.चंद्राताई शेणोलीकर यांचा २९ वा स्मृतिदिनानिमित आयोजित जीवन सुंदर आहे या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी भिलवडी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष विश्वास चितळे होते.प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते डॉ. चंद्राताई शेणोलीकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
यापुढे बोलताना प्रा.गणेश शिंदे म्हणाले की,शिक्षकाच्या आयुष्याची पूंजी म्हणजे त्यांनी घडविलेले विद्यार्थी होय.आपल्या वर्गात शिकणाऱ्या पिढ्यांच्या आर्थिक व सामाजिक स्तर उंचावण्यासाठी शिक्षकांनी योगदान दिले पाहिजे.व्यवस्थापन व तंत्रज्ञानात बदल होत असले तरीही शिक्षणावर प्रेम करणाऱ्या शिक्षकांचं महत्व कधीच कमी होणार नाही.
डॉ.चंद्राताई शेणोलीकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त भिलवडी शिक्षण संस्थेच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय विविध सपर्धांचा पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला.
प्रास्ताविक व स्वागत संस्थेचे सचिव मानसिंग हाके यांनी केले.सहसचिव के.डी.पाटील यांनी सूत्रसंचालन केले.प्रा.महेश पाटील यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला.तर यांनी आभार विजय तेली यांनी मानले.
यावेळी विश्वस्त गिरीश चितळे,डॉ.सुहास जोशी,अशोक चौगुले,संचालक सौ.लीना चितळे,महावीर वठारे,डॉ. रविंद्र वाळवेकर,मुकुंद जोग,संभाजी सूर्यवंशी,अजय चौगुले,सदाशिव तावदर, चंद्रकांत पाटील,प्राचार्य डॉ.दीपक देशपांडे,मुख्याध्यापक संजय मोरे,सुकुमार किणीकर,विद्या टोणपे,स्मिता माने,सुचेता कुलकर्णी आदींसह शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी,विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.