दर्पण न्यूज भिलवडी ;- सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील भिलवडी सार्वजनिक वाचनालय भिलवडी येथे बुधवार दिनांक 28 रोजी स्वातंत्र्यवीर वि. दा.सावरकर यांची जयंती साजरी करण्यात आली.
प्रतिमा पूजन हणमंत डिसले यांनी केले. स्वागत प्रास्ताविक साहित्यिक कवी सुभाष कवडे सर यांनी केले.
यावेळी संस्थेचे विश्वस्त जी जी पाटील उपस्थित होते. तसेच ग्रंथपाल मयुरी नलवडे, लेखनिक विद्या निकम, माधव कटिकर, वाचक आणि ग्रंथप्रेमी तसेच बालवाचक उपस्थित होते.