महाराष्ट्रराजकीयसामाजिक
कागल येथे श्री हनुमान मंदिरात श्री शनेश्वर जन्मकाळ सोहळ्यास वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची उपस्थिती

दर्पण न्यूज कागल तालुका प्रतिनिधी (मारूती डी कांबळे):-कागल शहरातील श्री. हनुमान मंदिरात श्री. शनेश्वर जन्मकाळ सोहळ्यानिमित्त वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसनसाहेब मुश्रीफ यांनी श्री. शनेश्वराचे मनोभावे दर्शन घेतले.
*या प्रसंगी त्यांनी धार्मिक वातावरणात सहभागी होत भक्तीभावाने पूजा केली, आणि जनतेसाठी शांतता, समृद्धी व आरोग्य यासाठी प्रार्थना केली. मंदिर परिसरात उपस्थित भाविकांनीही मंत्री श्री मुश्रीफ यांचे स्वागत केले. हा धार्मिक सोहळा श्रध्दा, भक्ती आणि सामाजिक एकतेचे प्रतीक ठरला.*
*यावेळी अशोकराव जकाते, धीरज सनगर, अरुण बोंगाळे, उदय नाळे, प्रियांकांत मोरे, ज्ञानेश्वर पोवार, बाळू मोरे, संतोष शिंदे, सचिन नलवडे, शशिकांत भालबर, आदींसह मान्यवर व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.*