राधानगरी तालुक्यातील राजापूर -चाफोडी रस्त्याचा ऑनलाईन प्रस्ताव करा , अन्यथा रस्ता रोको ; गोकुळ संचालक अभिजित तायशेटे यांचा इशारा

कोल्हापूरः अनिल पाटील
राधानगरी तालूक्यातील वाकीघोल परिसराला जोङणार्या राजापूर ते चाफोङी या रस्त्याचा त्वरित ऑनलाईन प्रस्ताव करा अन्यथा येत्या दहा दिवसात राधानगरी येथे रस्तारोको करण्यात येईल असा इशारा गोकूळ दूध संघाचे संचालक अभिजीत तायशेटे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता बी. एल. हजारे यानां निवेदनाद्वारे दिला आहे.
या निवेदनात म्हंटले आहे की,राधानगरी तालूक्यातील वाकीघोल हा राधानगरी तालूक्याचा अविभाज्य घटक आहे. सद्या वाकीघोलामध्ये तीन ग्रामपंचायती व दहा ते बारा वाङ्यावस्त्या आहेत, हा मार्ग राधानगरीला जोङणारा रस्ता आहे तो वनविभागाच्या हद्दीतून जातो, वनविभाग ङांबरीकरण किंवा पक्का करण्यासाठी त्याला वनविभागाच्या केंद्राची किंवा राज्याची परवानगी घेणे आवश्यक आहे. या मागणीसाठी अनेक वर्ष सार्वजनिक बांधकाम विभाग,वनविभाग यांना निवेदन देवून पाठपूरावा केला आहे.
तालूक्याच्या कामासाठी किंवा बाजारपेठेत जाण्यासाठी लोकानां जवळ जवळ 60 किलोमिटरचा कङगाव,गारगोटी,मूदाळतिट्टा असा वळसा घालून राधानगरीला यावे लागते. हे तालूक्याच्या दूष्टीने खेदजनक बाब आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याबाबत आॅनलाईन प्रस्ताव करण्याची कार्यवाही येत्या 10 दिवसात करावी अन्यथा राधानगरी येथे रास्तारोको करण्यात येईल असा इशारा गोकुळ संचालक तायशेटे यांनी दिला आहे