भिलवडी येथे पोलिसांचा जल्लोष ; भक्तीभावाने गणेश मूर्तीचे विसर्जन
पारंपरिक वाद्य, पारंपरिक वेशभूषेत पोलिसांचा ठेका

भिलवडी : सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील भिलवडी पोलिस ठाण्यात पोलिस बंधूंनी-बघिनींनी आपली जनसेवेची जबाबदारी सांभाळत गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना केली होती. आज अनंत चतुर्दशी दिवशी सकाळीचीच वेळ घेऊन पारंपरिक वेशभूषेत आणि पारंपरिक वाद्यांच्या तालावर, ठेक्यावर भक्तीभावाने गणेश मूर्तीचे कृष्णा नदीच्या पात्रात विसर्जन केले.
गेल्या एक महिन्यांपासून गणेश भक्तांसाठी अत्यंत प्रामाणिक सेवा भिलवडी पोलिस बजावली. भिलवडी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक नितीन सावंत यांनी ही भिलवडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या प्रत्येक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळास भेटी दिल्या. अनेक गणेश भक्तांच्या अडचणी समजावून घेण्याचा प्रयत्न केला. दररोजच्या बंदोबस्त धावपळीच्या काळातही पोलिस बांधवांनी भिलवडी पोलिस ठाण्यात गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना केली होती.
अनंत चतुर्दशी दिवशी सकाळीचीच वेळ घेऊन पारंपरिक वेशभूषेत आणि पारंपरिक वाद्यांच्या ठेक्यावर भक्तीभावाने गणेश मूर्तीची भिलवडीतील मुख्य बाजारपेठेतून मिरवणूक काढण्यात आली. या गणेश मूर्तीचे कृष्णा नदीच्या पात्रात विसर्जन केले. या मिरवणुकीत वरिष्ठ पोलीस अधिकारी, पोलिस कर्मचारी, पत्रकार आणि नागरिकांचा सहभाग होता.