महाराष्ट्रराजकीय

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचा मंत्रिमंडळात समावेश  राज्यपालांकडून छगन भुजबळ यांना मंत्री पदाची शपथ

 

दर्पण न्यूज मुंबई महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन चंद्रभागा चंद्रकांत भुजबळ  यांना राज्याच्या मंत्री पदाची शपथ दिली.

 

विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदेविधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत राजभवन मुंबई येथे  झालेल्या एका छोटेखानी शपथविधी समारंभात राज्यपालांनी छगन भुजबळ  यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.

यावेळी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेसंसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदा (गोदावरी आणि कृष्णा खोरे विकास महामंडळ) मंत्री राधाकृष्ण विखे -पाटील, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसेवैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफअन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळउद्योग, मराठी भाषा मंत्री उदय सामंत, आदिवासी विकास मंत्री अशोक उईकेइतर मागास बहुजन कल्याणदुग्ध व्यवसाय विकास विभाग मंत्री अतुल सावेक्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणेकौशल्य विकास, रोजगार  उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढासामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट,मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड, खासदार प्रफुल्ल पटेलसुनील तटकरे, मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती, राज्यपाल यांचे सचिव प्रशांत नारनवरे,तसेच मंत्री  छगन भुजबळ यांचे कुटूंबीय यावेळी उपस्थित होते.

सुरुवातीला मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी शपथविधी सोहळ्यासाठी राज्यपालांची अनुमती मागितली. त्यानंतर राज्यपालांनी छगन भुजबळ यांना शपथ दिली. शपथविधी नंतर राज्यपालांनी श्री.भुजबळ यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील श्री.भुजबळ यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!