कुरुकली येथील सामाजिक कार्यकर्ते साताप्पा कांबळे यांना डाॅक्टरेट पदवी प्राप्त ; गडहिंग्लज येथे सत्कार

दर्पण न्यूज कागल तालुका प्रतिनिधी (मारूती डी कांबळे)-: कोल्हापूर जिल्हा कागल तालुक्यातील कुरुकली येथील सुपुत्र व सध्या चैतन्य अपंग मती विकास विद्यालय गडहिंग्लज संस्थापक अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते साताप्पा कांबळे यांना Asia international calture Reseorch university च्या वतीने सोशल वर्क अँड पीपल कन्सलन बेंगलोर डॉक्टेरपदी पदवी प्राप्त झाल्याबद्दल त्यांचा सत्कार गडहिंग्लज येथे भारतीय संविधान , शाल व गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांच्या निवडी प्रसंगी त्यांचा सत्कार करताना बस्तवडे गावचे मा.सरपंच व संजय गांधी निराधार योजना समिती सदस्य साताप्पा कांबळे , सामाजिक कार्यकर्ते महेश धम्मरक्षित सर, आर आर प्रधान सर पंडेवाडी, विनोद कांबळे मोगार्डे, नागेश कांबळे व्हनाळीकर, दत्तात्रय कांबळे कुरुकुली, दिलीप कांबळे सर कापशीकर, हिरामणी कांबळे सर नद्यांळ व अमर जिरगे व उदय कांबळे बानगेकर इत्यादींनी सत्कार केला. यावेळी सर्व उपस्थितीचे स्वागत व प्रस्ताविक साताप्पा कांबळे बस्तवडेकर यांनी केले. व निवडी प्रसंगी शुभेच्छा दिल्या. यावेळी सत्कार ला उत्तर देताना साताप्पा कांबळे कुरुकुली यांनीही आपल्या मनोगतात आतापर्यंत आपल्या सामाजिक कार्याचा आढावा घेतला. व आतापर्यंत विविध पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांची ही माहिती त्यांनी दिली.व महापुरुषांचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्याचे प्रामाणिकपणे काम केले. म्हणून तर आतापर्यंत केलेल्या कार्याचा आढावा घेऊन मला बेंगलोर विद्यापीठाने डॉक्टरेट पदवी दिली. यावेळी या सर्वांचे आभार हिरामणी कांबळे सर यांनी मानले.