धाराशिव शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने स्व आधार मतिमंद मुलींच्या बालगृह येथे फळे वाटप व आर्थिक मदत

दर्पण न्यूज धाराशिव प्रतिनिधी
(संतोष खुणे) :-
आज रविवार, ३१ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष *श्री.हर्षवर्धन सपकाळ* यांच्या वाढदिवसानिमित्त धाराशिव शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने स्वआधार मतिमंद मुलींचे बालगृह, विमानतळ रोड, आळणी, धाराशिव येथे *”फळे वाटप व आर्थिक मदत”* कार्यक्रम संपन्न झाला.
प्रदेशाध्यक्षांच्या वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्च टाळून सामाजिक उपक्रम घेऊन शहर काँग्रेसच्या वतीने प्रदेशाध्यक्षांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
यावेळी संस्थेचे प्रमुख शहाजी चव्हाण, जिल्हा काँग्रेसचे संघटक राजाभाऊ शेरखाने, वरिष्ठ उपाध्यक्ष सय्यद खलील सर, उपाध्यक्ष प्रशांत पाटील, शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे, बाजार समितीचे संचालक उमेश राजेनिंबाळकर, ओबीसी विभागाचे जिल्हाध्यक्ष धनंजय राऊत, ज्येष्ठ नेते प्रदीप घुटे-पाटील, जिल्हा सरचिटणीस सरफराज काझी, युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष धवलसिंह लावंड, सचिव सौरभ गायकवाड, सचिन धाकतोडे, कफील सय्यद, आरेफ मुलानी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक धवलसिंह लावंड यांनी केले तर आभार धनंजय राऊत यांनी मानले.