बस्तवडे येथे कर्मवीर राव डी. आर. भोसले विद्या मंदिर 1 मे महाराष्ट्र दिनी चावडी वाचन कार्यक्रम उत्साहात

दर्पण न्यूज कागल तालुका प्रतिनिधी (मारूती डी कांबळे) :-
*बस्तवडे ता.कागल येथील कर्मवीर राव डी. आर. भोसले विद्या मंदिर 1 मे महाराष्ट्र दिन चावडी वाचन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सुरुवातीस प्राथमिक शाळेतील ध्वजारोहण मुख्याध्यापक श्री. आनंदा मारुती माळी यांचे हस्ते करण्यात आले. तर या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सरपंच सौ सुनीता शिंत्रे ह्या होत्या. यावेळी मुख्याध्यापक श्री. आनंदा माळी यांनी सर्वांचे स्वागत करून आजच्या या शासनाच्या निर्णयानुसार एक मे महाराष्ट्र दिनानिमित्त चावडी वाचन कार्यक्रमाचा हेतू स्पष्ट केला. तर यावेळी गावचे मा.सरपंच व संजय गांधी निराधार योजना समिती सदस्य साताप्पा कांबळे यांनी आपल्या मनोगत मध्ये महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देऊन आज जो शासनाच्या निर्णयानुसार महाराष्ट्रात सर्व प्राथमिक शाळेमध्ये चावडी वाचन कार्यक्रम होत आहे हे कौतुकास्पद आहे. यामुळे प्राथमिक शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचे प्रगत दिसून येते. व ग्रामस्थ व पालकांना आपल्या मुलांचे शाळेतील प्रगत दिसून येते. यामुळे मुलांचे अभ्यास व वाचन याची माहिती सर्वांसमोर मांडता येते. यावेळी प्राथमिक शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी मराठी भाषा , हिंदी व विशेषता इंग्रजी भाषेचे वाचन केले. सर्व मुलांनी अतिशय चांगल्या प्रकारे वाचन केले. यावेळी ठाणेकर सर , सुहास कांबळे सर , सौ चव्हाण मॅडम, सौ. पाटील मॅडम इत्यादींनी या चावडी वाचन कार्यक्रम यशस्वीपणे पार पडण्यास सहकार्य केले. यावेळी उपसरपंच श्री. प्रवीण पाटील , ग्रामपंचायत सदस्य सदस्य प्रतिनिधी सदाशिव वायदंडे, पांडुरंग वांगळे, प्रकाश शिंदे, श्रीमती अंजना माळी ,गंगाधर शिंत्रे , शालेय समितीचे मा.अध्यक्ष प्रशांत पाटील , अमर कांबळे व शाळेतील सर्व विद्यार्थी उपस्थित होते. शेवटी या सर्वांचे आभार श्री अरविंद पाटील सर यांनी मानले.