मिरज ग्रामीणचे काॅंग्रेस, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी गटातील सलगरे, कानंडवाडी, आरग, बेडगच्या शेकडो कार्यकर्त्यांचा जनसुराज्य शक्ती पक्षात जाहीर प्रवेश : प्रदेशाध्यक्ष समीत दादा कदम यांची उपस्थिती
जनसुराज्य शक्ती पक्षातील शहर, ग्रामीण भागातील पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

दर्पण न्यूज मिरज :-;मिरज ग्रामीण भागातील काँग्रेस व शरदचंद्र पवार राष्ट्रवादी गटातील सलगरे, कानंडवाडी आरग बेडग मधील शेकडो कार्यकर्त्यांचा जनसुराज्य शक्ती पक्षात जाहीर प्रवेश केला.
मिरज तालुक्यातील काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाला गळती लागू असून नाराज गट जनसुराज्य शक्ती पक्षात मोठ्या प्रमाणात प्रवेश करत आहेत
जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समीत दादा कदम यांचे नेतृत्वावर विश्वास वाढल्याने ग्रामीण भागातील शेकडो आजी माजी पदाधिकारी कार्यकर्ते जनसुराज्य शक्ती पक्षात सामील होत आहेत ,
आज सलगरे येथील संग्राम कांबळे, कानंडवाडी अंकुश भोरे, रामदास भोरे , आरग येथील संतोष चव्हाण, बेडग येथील ज्ञानेश्वर जाधव या सर्वांनी जनसुराज्य शक्ती पक्ष मध्ये शेकडो कार्यकर्त्यांच्या सह समित दादा कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर प्रेवश केला , यावेळी महादेव अण्णा कुरणे जिल्हा अध्यक्ष आनंद सागर पुजारी शहर जिल्हाध्यक्ष पंकज म्हेत्रे शहर जिल्हाध्यक्ष डॉक्टर पंकज म्हेत्रे अमर दादा पाटील प्रवीण धेंडे अरविंद पाटील जयशिंग तात्या चव्हाण सलीम पठाण ,योगेश दरवंदर, मलिक शुभम वाघमारे यांच्या सह पदाधिकारी उपस्थित होते