महाराष्ट्र

मिरज शहरातील साचलेल्या कचऱ्याची त्वरित स्वच्छता करावी : सी.आर. सांगलीकर फौंडेशनची मागणी

महापालिका प्रशासनाला निवेदन ; ..अन्यथा आंदोलन छेडणार

मिरज : मिरज शहरात जागोजागी साचलेला कचरा उचलून त्वरित स्वच्छता करावी , अशी  मागणी सी.आर. सांगलीकर फौंडेशनच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन  महापालिका प्रशासनाला देण्यात आले आहे.

महानगरपालिका क्षेत्रातील मिरज शहरात ठिक ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचलेले आहेत ते तातडीने रोजच्या रोज उचलून नियमित स्वच्छता करावी व नित्यनियमाने औषध फवारणी करावी.सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत.पावसाच्या पाण्याने कचरा कुजुन जागोजागी दुर्गंधी पसरत आहे, त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.मिरज शहरातील एसटी स्टँड परीसर,धनगर गल्ली, इसापुरे गल्ली, गणेश तलाव परिसर, गवळी गल्ली,मंगळवार पेठ, खतीबनगर, एम.आय.डी.सी.अशा अनेक वर्दळीच्या ठिकाणी कच-याचे ढीग साचलेले आहेत,यामध्ये प्लास्टिक पिशव्यांचा भरणा जास्त आहे.खाद्य शोधण्याच्या नादान भटकी जनावरे सर्व कचरा विस्कटून रस्त्यावर आणत आहेत.यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
महापालिका प्रशासनाने त्वरित कचरा उचलून स्वच्छता करून तिथं औषध फवारणी करावी.नियमितपणे कचरा उचलून स्वच्छता राखावी आणि नागरीकांच्या जीवाशी चाललेला खेळ त्वरित थांबवावा.अशी मागणी सी.आर सांगलीकर फाउंडेशनच्या वतीने निवेदनाद्वारे केली आहे.अशा मागणीचे निवेदन महापालिका प्रशासनाला सी. आर.सांगलीकर फौंडेशनच्यावतीने देण्यात आले आहे. अन्यथा आम्हाला तीव्र आंदोलन करावे लागेल, असा इशाराही देण्यात आला आहे.

सी आर सांगलीकर फौंडेशन यांनी केलेली मागणी रास्त असल्याची चर्चा लोकांमधून होत आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!