
दर्पण न्यूज कागल तालुका प्रतिनिधी (मारूती डी कांबळे ):-
वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी अपघातात मृत झालेल्या कागलमधील दलित कार्यकर्त्याच्या कुटुंबांना दोन लाखांची आर्थिक मदत दिली. मंत्री श्री. मुश्रीफ यांचे दातृत्व आणि सामाजिक बांधिलकीमुळे समाज बांधव गहिवरले.याबाबत अधिक माहिती अशी, कागल शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरनगरमधील कु. समीर किरण कांबळे हा २३ वर्षाचा अविवाहित तरुण कार्यकर्ता. त्याच्या पाठीमागे आई आणि दोन बहिणी असा परिवार आहे. तो दि. १४ एप्रिल २०२५ रोजी सकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या कार्यक्रमाहून माणगाववरून कागलकडे परतत होता. राष्ट्रीय महामार्गावर कागल एस. टी. डेपोसमोरच मोटार सायकल घसरल्यामुळे त्याचा अपघात होऊन डोकीला गंभीर मार लागला. शर्तीचे प्रयत्न करूनही तो वाचला नाही.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीदिवशी सकाळीच अपघाताची दुर्घटना घडली.