मुख्यमंत्री वयोश्री योजना अंतर्गत तीस कोटी महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय विभागाने लाभार्थ्यासाठी मंजूर : संबंधितांचे आभार

कागल तालुका प्रतिनिधी (मारूती डी कांबळे):-मुख्यमंत्री वयोश्री योजना अंतर्गत शंभर कोटी पैकी तीस कोटी रुपये महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय विभागाने महाराष्ट्रातील लाभार्थ्यासाठी मंजूर केले आहेत. या योजनेसाठी लाभार्थ्यांना फॉर्म भरले आहेत . अशा लाभार्थ्यांना त्यांच्या आरोग्याच्या उपकरणासाठी निधी मिळण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्याचे मा. खासदार संजय दादा मंडलिक साहेब यांनी वेळोवेळी सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट सो व संबंधित अधिकारी यांना भेटून , पत्राद्वारे निधीसाठी विशेष प्रयत्न केलेत. हा निधी लवकरच येत्या आठ-दहा दिवसांपर्यंत थेट लाभार्थ्यांच्या प्रत्येकी तीन हजार रुपये खात्यावर जमा होणार आहे. हा निधी ताबडतोब उपलब्ध करून दिल्याबद्दल महाराष्ट्र शासन , सामाजिक न्याय विभाग वयोश्री योजना विभाग कक्ष अधिकारी माननीय राजेश मांजरेकर साहेब यांचे विशेष अभिनंदन करून त्यांचे आभार मानले. तसेच कोल्हापूर जिल्ह्यामध्ये वयोश्री योजना अत्यंत प्रभावीपणे राबविण्यासाठी समाजकल्याण सहायक आयुक्त सचिन साळी साहेब , सर्व संबंधित अधिकारी , व सचिन परब साहेब यांची सुद्धा विशेष सहकार्य लाभले. याबद्दल मंत्रालय मुंबई मध्ये जाऊन संबंधित अधिकारी व कोल्हापूर जिल्ह्याचे मा. खासदार संजय दादा मंडलिक साहेब आभार मानण्यात आले. या वेळी संजय गांधी निराधार योजना समिती सदस्य साताप्पा कांबळे बस्तवडेकर , दिलीप कांबळे सर मुरगुड मा. नगरसेवक , सामाजिक कार्यकर्ते नागेश कांबळे व्हनाळीकर आदी उपस्थित होते.