राष्ट्रीय समाजवादी पार्टी पिंपरी चिंचवड पुणे महानगरपालिका लढवणार : पुणे महिला जिल्हाध्यक्षा अंजलीताई कांबळे यांची माहिती

कोल्हापूरःअनिल पाटील
राष्ट्रीय समाजवादी पार्टी तर्फे पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षात फेरबदल करण्यात आले. महिला आघाडी पुणे जिल्हा अध्यक्ष पदासाठी सौ अंजलीताई कांबळे यांची निवड करण्यात आली तर पुणे जिल्हा उपाध्यक्ष पदासाठी सौ स्मिता देशपांडे यांची निवड जाहीर करण्यात आली पिंपरी चिंचवड शहर अध्यक्षपदासाठी सौ मालिका महंमद शेख पिंपरी-चिंचवड शहर उपाध्यक्षपदी मंगल साहेब कांबळे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली पिंपरी चिंचवड शहरावर समाजवादी पार्टीचा स्वस्तिक झळकवण्याचा निर्धार नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी केला असून पिंपरी चिंचवड शहरातील तळागाळातील जनसामान्यांचे प्रश्न समस्या हाताळण्याची घरोघरी जाऊन लोकांमध्ये विश्वास निर्माण करण्याची तयारी सर्व महिला पदाधिकाऱ्यांनी सुरू केली आहे स्थानिक सर्व राजकारणाला जनता कंटाळलेली आहे आणि या बदलत्या जनमानसाच्या मानसिकतेचा फायदा घेत लोक हिताची काम करण्यासाठी व्यवस्थेमध्ये जाऊन महापालिका सभागृहामध्ये जाऊन ताकतीने जनतेचे प्रश्न आम्ही सोडवू अशी ग्वाही या सर्व महिला पदाधिकाऱ्यांनी दिली.