कृषी व व्यापारमहाराष्ट्र

सामाजिक समता सप्ताह निमित्त मार्जिन मनी योजनेंतर्गत कार्यशाळेस उत्स्फूर्त प्रतिसाद

 

           दर्पण न्यूज सागली : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह निमित्त  आज सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय सांगली येथे मार्जिन मनी योजनेंतर्गत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

            या कार्यशाळेस जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक विद्या कुलकर्णी, समाज कल्याण कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त नितीन उबाळे, नवउद्योजक अर्जन सकट, अभिजीत गोंधळे आदि उपस्थित होते.

            या कार्यक्रम प्रसंगी जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक विद्या कुलकर्णी यांनी मार्जिन मनी योजनेविषयी सविस्तर मार्गदशन करून या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले.

            मार्जिन मनी योजनेचे पहिले लाभार्थी नवउद्योजक अर्जन सकट यांनी त्यांचा अनुभव व्यक्त करताना प्रशासननाने बँक प्रशासनास एकत्र घेवून अशा प्रकारे कार्यशाळेचे नियोजन करण्यात यावे असे सुचविले. नवउदयोजक अभिजित गोंधळे यांचा सध्या कडेगाव एमआयडीसी मध्ये कोरोगेटेड बॉक्स चा व्यवसाय सुरू असुन त्यांनी त्यांचे अनुभव सांगितले तसेच प्रशासन व बँक यांनी केलेल्या मदतीचा उल्लेख त्यांनी यावेळी केला.

            सहाय्यक आयुक्त नितीन उबाळे यांनी प्रास्ताविक केले व सामूहिक उद्देशिका वाचन केले. ग्रामीण व शहरी भागात पथनाट्य व शहरी भागात लघुनाटिकांचे आयोजन होणार असल्याचे सांगून मागासवर्गीय उद्योजकांनी स्टँड अप योजना, पीएईजीपी, सीएमईजीपी या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

            या कार्यक्रमास समाज कल्याण कार्यालयाचे अधिकारी, कर्मचारी, बार्टीचे समतादूत, नागरिक उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!