महाराष्ट्र

जिल्हा नियोजन समितीच्या कामावरील स्थगिती न उठवल्यास 21 तारखेपासून उपोषण : शिवसेना जिल्हा संघटक सुधीर पाटील यांचा इशारा

 

 

 

दर्पण न्यूज धाराशिव (प्रतिनिधी)
संतोष खुने :-
जिल्हा नियोजन समितीच्या कामांना स्थगिती देऊन कुरघोडीचे राजकारण करण्यात येत आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या विकासाला खीळ बसली आहे. पालकमंत्री प्रताप सरनाईक अत्यंत प्रामाणिक काम करणारे शिवसैनिक, मंत्री असून,त्यांची महायुतीच्या नेत्यांकडून आणि लोकप्रतिनिधींकडून बदनामी सुरू आहे अशा प्रकारची बदनामी धाराशिव जिल्ह्यातील शिवसैनिक खपून घेणार नाही . त्यांच्या बद्दलच्या अफवा, चर्चा थांबवा, कामांची स्थगिती तत्काळ उठवा अन्यथा 21 एप्रिलपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिवसेनेच्या वतीने उपोषण केले जाईल,असा इशारा शिवसेनेचे जिल्हा संघटक सुधीर पाटील यांनी दिला आहे.

जिल्हा नियोजन समितीच्या कामांना देण्यात आलेल्या स्थिगितीच्या पार्श्वभूमीवर सुधीर पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट केली.

ते म्हणाले, महायुतीच्या काही नेत्यांनी पडद्यामागून पालकमंत्र्यांची बदनामी सुरू केली असून,त्यांच्यावर घाणेरडे आरोप केले जात आहे. असे प्रकार सुरूच राहिल्यास येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत सोबत राहायचे की नाही,हे ठरवावे लागेल. जिल्ह्याचे पालकमंत्री बदलण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचा गंभीर आरोप करत त्यांनी पालकमंत्री बदलण्याचे डाव असतील तर हे खपवून घेतले जाणार नाहीत, असा इशारा दिला.
महायुतीतील सर्वच तिन्ही पक्ष मीच चालवतो, मी काहीही करू शकतो, पालकमंत्र्यांना, मुख्यमंत्र्यांना अडवू शकतो, अशी तुळजापूरच्या लोकप्रतिनिधींची धारणा झाली आहे. कामांना दिलेल्या स्थगितीसारख्या अनेक घटना घडत आहेत.

लोकप्रतिनिधींच्या संदर्भातील निधी वाटप सूत्र वरिष्ठ स्तरावरून ठरलेले असताना अडवणूक कशासाठी केली जात आहे, असा सवाल करून निधी अडवण्याचा कुणालाही अधिकार नाही. पालकमंत्र्यांची बदनामी सहन केली जाणार नाही, जिल्हा नियोजन समितीच्या कामात टक्केवारी वगैरे काहीही नाही. केवळ बदनामीपोठी हा प्रकार सुरू आहे. खालच्या खाली हे प्रकार सुरू आहेत. पालकमंत्री आणि त्यांच्या स्वीय सहायक यांच्याशी माझे बोलणे झाले आहे.त्यांनी असे प्रकार खपवून घेणार नाही, असे सांगितले असल्याचे सुधीर पाटील यांनी सांगितले.

21 तारखेला उपोषण

जिल्हा नियोजन समितीच्या कामावरील स्थगिती उठवावी, 21 तारखेपूर्वी शासनाने निर्णय घेण्याची गरज आहे. अन्यथा स्व.बाळासाहेबांच्या विचाराचे सर्व शिवसैनिक आंदोलनात उतरतील आणि 21 तारखेपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू होईल, असा इशारा सुधीर पाटील यांनी दिला. यासंदर्भात सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!