स्वाभिमानी ऊस तोडणी वाहतूक संघटनेच्या लढ्याला अखेर यश : संदीप राजोबा

दर्पण न्यूज वसगडे -: ऊस तोडणी कामगाराकडून होणारी फसवणूक टाळण्यासाठी राज्य सरकारने तातडीने नवीन कायदा करण्यासाठी ठोस पावले उचलले आहेत या नवीन कायद्यामुळे ऊस तोडणी कामगारांकडून होणारी लूट थांबवण्यासाठी चाप बसणार आहे स्वाभिमानी वाहतूक संघटनेच्या लढायला यश आले असल्याची प्रतिक्रिया स्वाभिमानी ऊस तोडणी वाहतूक संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष संदीप राजोबा यांनी दिली.
याबाबत बोलताना संदीप राजोबा म्हणाले की,यापूर्वी गृह खाते पोलीस स्टेशनला ऊस वाहतूकदार शेतकऱ्यांच्या तक्रारी नोंदवून घेत नव्हते परंतु स्वाभिमानी ऊस तोडणी वाहतूक संघटनेच्या रेट्यामुळे जवळपास पंधराशे केसेस आज अखेर नोंद झालेले आहेत. तसेच कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 22 कोटी व सांगली जिल्ह्यामध्ये 14 कोटी रुपये ऊस वाहतूकदारांचे वसूल झालेले आहेत. 11 फेब्रुवारी 2025 रोजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना भेटून कायद्यामध्ये बदल करावे तसेच 50% रक्कम भरल्याखेरीज जामीन देऊ नये. यावर इतर मागण्या देण्यात आल्या होत्या त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी तात्काळ निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते
सरकारच्या या निर्णयामुळे ऊस वाहतूक दारांची फसवणूक थांबण्यासाठी निश्चितच मदत होणार आहे
ऊस वाहतूकदार, ऊसतोडणी मुकादम, ऊसतोडणी मजूर, यांच्यात उचलीच्या (अग्रीम) रकमेवरुन होणारी कोट्यवधी रुपयांची फसवणूक टळावी, त्यामुळे होणारे गुन्हे थांबावेत, ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होऊ नये, ऊसतोडणी मजूरांसह सर्वांच्या हक्कांचे रक्षण व्हावे, एकाही घटकावर अन्याय होऊ नये, यासाठी ऊसतोडणी मुकादम व मजूरांचे संनियंत्रण करणाऱ्या सर्वसमावेशक कायद्याचा मसुदा तयार करण्यात यावा,” असे निर्देश राज्य सरकारने दिले आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
स्वाभिमानी ऊस तोडणी वाहतूक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी व मार्गदर्शक पृथ्वीराज पवार यांनी ऊस वाहतूकदारांची फसवणूक करणाऱ्या मुकदम व मजुरांच्या विरोधात सातत्याने शासन दरबारी आवाज उठवला होता. तसेच ऊस वाहतूक मालकांचा सांगली ते कोल्हापूर असा ट्रॅक्टर मोर्चा काढला होता त्यावेळी त्यांनी सरकारला मुंबई मंत्रालय कडे सदर मोर्चा वळवण्याचा वळवण्याचा इशारा दिला. त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री तथागृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी याबाबत कठोर पावले उचलण्यासाठी आश्वासित केले होते आज त्यांच्या प्रयत्नाला यश येताना दिसत आहे.