भिलवडी येथील सार्वजनिक वाचनालय येथे 64 वा वाचन कट्टा उत्साहात

दर्पण न्यूज भिलवडी :- सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील भिलवडी येथील सार्वजनिक वाचनालय भिलवडी येथे एक एप्रिल 2025 रोजी 64 वा वाचन कट्टा उत्साहात संपन्न झाला. अध्यक्षस्थानी वाचनालयाचे संचालक मकरंद चितळे होते. यावेळी उपाध्यक्ष डी. आर. कदम विश्वस्त जी.जी. पाटील,कार्यवाह सुभाष कवडे, मयुरी नलवडे, विद्या निकम, गजानन माने यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळी झालेल्या सादरीकरणांमध्ये श्रीयुत जयंत केळकर, रमेश चोपडे, जयदीप पाटील, श्री. शिंदे महादेव जोशी, यांच्यासह अनेकांनी वाचलेल्या पुस्तकांची सविस्तर माहिती सांगितली पुढील वाचन कट्ट्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर किंवा महात्मा बसवेश्वर यांच्या विषयी वाचलेले पुस्तक हा विषय निश्चित करण्यात आला. मकरंद चितळे यांनी उपस्थित राहून वाचन कट्ट्यास शुभेच्छा दिल्या. सुभाष कवडे कार्यवाह यांनी सूत्रसंचालन केले.उर्मिला डीसले वहिनी यांनी आभार मानले. यावेळी त्यांनी गोंदवलेकर महाराजांच्या चरित्र विषयी विस्ताराने माहिती सांगितली.