महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉरमेशन – मित्र संस्थेच्या नियामक मंडळाच्या उपाध्यक्षपदी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची निवड
आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे अनेक मान्यवर आणि नागरिकांकडून अभिनंदनाचा वर्षाव

दर्पण न्यूज (धाराशिव प्रतिनिधी : संतोष खुने) :-
महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉरमेशन – मित्र या संस्थेच्या नियामक मंडळाच्या उपाध्यक्षपदी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीमुळे आमदार राणाजगजितसिंह पाटील अनेक मान्यवर आणि नागरिकांकडून अभिनंदन होत आहे.
नीती आयोगाप्रमाणेच राज्यात ‘महाराष्ट्र इन्स्टिट्युशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन – मित्र’ स्थापना करण्यात आली होती. ‘मित्र’ हे राज्याच्या विकासाला धोरणात्मक, तांत्रिक तसेच कार्यात्मक दिशा देणारी थिंक टँक आहे. राज्य सरकारचे विविध विभाग, केंद्र सरकार, नीती आयोग, सामाजिक संस्था, विविध अशासकीय संस्था तसेच खासगी व्यावसायिक संस्था यांच्यात राज्याचे उद्दिष्ट साध्य करण्याच्या हेतूने समन्वय तसेच सल्ला देण्याचे काम करील.
विकसित भारताचे ध्येय साध्य करण्यासाठी केंद्र सरकारमार्फत नीती आयोगाच्या धर्तीवर राज्यामध्येही अशा संस्थेची स्थापना करण्यात आली होती. ‘मित्र’ला मार्गदर्शन करण्यासाठी मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली नियामक मंडळ व दैनंदिन कामकाजासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली कार्यकारी मंडळ आहे. नियामक मंडळात उपमुख्यमंत्री सहअध्यक्ष असतील, तसेच उपाध्यक्षपदी तज्ज्ञ व्यक्तीची नियुक्ती करण्यात येईल. नीती आयोगाच्या धोरणाशी सुसंगत राज्याच्या गरजांची दखल घेत खासगी क्षेत्र व अशासकीय संस्थांच्या सहभागाद्वारे राज्याचा जलद आणि सर्वसमावेशक विकास साधणे हा ‘मित्र’च्या स्थापनेचा हेतू आहे.
राज्य सरकारकडे सोपविलेल्या विषयांपैकी कृषी व संलग्न क्षेत्र, आरोग्य व पोषण, शिक्षण, कौशल्य विकास व नावीन्यता, नागरीकरण व बांधकाम क्षेत्र विकास आणि भूमी प्रशासन, वित्त, पर्यटन आणि क्रीडा, ऊर्जा संक्रमण आणि वातावरणीय बदल, उद्योग आणि लघु उद्योग, पायाभूत सुविधा, माहिती-तंत्रज्ञान, पूरक सेवा व दळणवळण या पारंपारिक क्षेत्रावर ‘मित्र’द्वारे लक्ष केंद्रीत करण्यात येत असते. .
आमदार राणाजगजितसिंह पाटील हे माजी मंत्री राहिलेले असून त्यांचा कृषी, उद्योग यासह अनेक महत्वाच्या विषयांचा अभ्यास आहे. एक अभ्यासू नेत्याला संधी दिल्याबद्दल मुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांचे जिल्हा वासियांच्या वतीने मनःपूर्वक आभार !! आणि दादा पुढील कार्यास शुभेच्छा !!