धाराशिव जिल्हा पत्रकार संघाची नूतन कार्यकारिणी जाहीर
नूतन अध्यक्ष देविदास पाठक, सरचिटणीस रवींद्र केसकर यांची निवड

धाराशिव जिल्हा पत्रकार संघाची नूतन का
दर्पण न्यूज धाराशिव प्रतिनिधी( संतोष खुने ) :-
धाराशिव जिल्हा पत्रकार संघाची नूतन कार्यकारिणी मावळते अध्यक्ष चंद्रसेन देशमुख यांनी जाहीर केली असून, यामध्ये अध्यक्षपदी देविदास पाठक, उपाध्यक्ष गोविंदसिंग राजपूत तर सरचिटणीस म्हणून रवींद्र केसकर यांची निवड करण्यात आली आहे.निवडीबद्दल नूतन कार्यकारिणीचे अभिनंदन होत आहे.
–
धाराशिव जिल्हा पत्रकार संघाच्या कार्यकारिणीची मुदत संपल्याने नूतन कार्यकारिणी निवडीसंदर्भात अध्यक्ष चंद्रसेन देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली.
यावेळी पुढील दोन वर्षांसाठी पत्रकार संघाची नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.यामध्ये अध्यक्षपदी देवीदास पाठक,उपाध्यक्ष गोविंदसिंह राजपूत,
सरचिटणीस रविंद्र केसकर, सहचिटणीस कालिदास म्हेत्रे,कोषाध्यक्ष बालाजी निरफळ ,जिल्हा संघटकपदी विकास सूर्डी, सहसंघटक महेश पोतदार, प्रसिध्दी प्रमुख राकेश कुलकर्णी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.कार्यकारिणी सदस्यपदीचंद्रसेन देशमुख, सुहास सरदेशमुख, भीमाशंकर वाघमारे, आपासाहेब शेळके, ज्ञानेश्वर पतंगे, राजेंद्रकुमार जाधव, शितल वाघमारे, बालाजी सुरवसे,
ओंकार कुलकर्णी, सुधीर पवार, यांची निवड करण्यात आली.पत्रकार संघाचे मार्गदर्शक म्हणून अनंत अडसूळ, कमलाकर कुलकर्णी, विशाल सोनटक्के, दिलीप पाठक-नारीकर, सयाजी शेळके,संजय पाटोळे, बाळासाहेब मुंदडा राहतील.
यावेळी पत्रकार संघाच्या वतीने लवकरच जिल्ह्यातील पत्रकारांचा विमा काढण्यात येणार असून, जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या पत्रकारांची छायाचित्रासह संपर्क क्रमांक असलेले कॉफी टेबल प्रसिद्ध करण्याचा निर्णय घेण्यात आला.
यावेळी नूतन पदाधिकाऱ्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.