धाराशिव नगराध्यक्षपदासाठी जनतेची ‘राजकन्या’ पुढे ; विकास, स्वच्छता आणि जनसंपर्काचा दमदार फॉर्म्युला

दर्पण न्यूज धाराशिव: प्रतिनिधी संतोष खुणे – : शहरातील आगामी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगराध्यक्षपदासाठी अनेक दावेदारांची नावे चर्चेत असताना, माजी नगरसेविका सौ. राजकन्या पोपट अडसूळ यांचे नाव सध्या सर्वाधिक गाजत आहे. 2016 च्या नगर परिषद निवणुकीत त्यांच्या परिवारातील प्रभाग क्रमांक 01 मधून त्यांच्या चुलत सासू नगरसेविका सौ.अनिता कल्याण पवार तसेच प्रभाग क्रमांक 03 मधून चुलत दिर नगरसेवक श्री.सचिन ऊर्फ राजाभाऊ पवार हे विजयी झाले. सौ.राजकन्या पोपट अडसूळ त्यांच्या प्रभागातील विकासकामे, लोकसंपर्क आणि सामाजिक उपक्रमांच्या बळावर नागरिकांकडून उमेदवारीसाठी मोठी मागणी होत आहे. राजकन्या अडसूळ यांनी नगरसेविका म्हणून आपल्या कार्यकाळात नागरिकांच्या दैनंदिन अडचणींवर लक्ष केंद्रित केले. त्यांनी प्रभागातील पाणी, स्वच्छता, प्रकाश व्यवस्था, रस्त्यांचे डांबरीकरण, तसेच महिलांच्या सुरक्षिततेसाठी महत्त्वाचे उपक्रम हाती घेतले. या कामांमुळे त्यांना “जनतेच्या मनातील नगरसेविका” म्हणून ओळख मिळाली. त्यामुळे नगराध्यक्ष पदासाठी सौ. अडसूळ यांची दावेदारी प्रबळ मानली जात आहे. भाजपाकडून सौ. अडसूळ यांच्या नावावर विचार सुरू असून, नागरिकांमधूनही उमेदवारीसाठी जोरदार मागणी करण्यात येत आहे.*
*धाराशिव नगर परिषद निवडणुकीची रणधुमाळी आता जोर धरत आहे. निवडणुकीची काही दिवसातच आचारसंहिता जाहीर होण्याची शक्यता असल्याने सर्वच पक्षांनी मोठी कंबर कसली आहे. धाराशिव नगरपरिषदेचे अध्यक्ष पद यावेळी ओबीसी महिलेसाठी राखीव आहे. त्यामुळे इच्छुकांकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. नगराध्यक्ष पदासाठी अनेक नावे समोर येत असली तरी माजी नगरसेविका राजकन्या अडसूळ यांचे नाव सर्वाधिक चर्चेत आहे. सौ. अडसूळ या युवा नेते सन्नी पवार यांच्या वहिनी असून, दोघांचाही प्रभागात दांडगा जनसंपर्क आहे. सौ अडसूळ यांनी प्रभाग क्रमांक ४ चे प्रतिनिधित्व केले. आपल्या कार्यकाळात सौ अडसूळ यांनी लोकाभिमुख कार्ये करत जनतेच्या मनात विश्वास संपादन केला आहे. सौ. अडसूळ यांनी शहरातील पाणीपुरवठा व्यवस्था सुधारण्यासाठी जुनी पाईपलाईन बदलण्याचे काम केले. रस्ते, गटारी व सार्वजनिक जागांची दुरुस्ती करून वाहतुकीचा व स्वच्छतेचा प्रश्न मिटवला. ‘स्वच्छ प्रभाग – सुगंधित शहर’ या उपक्रमांतर्गत घराघरातून कचरा संकलन सुरू करून परिसर स्वच्छतेला प्राधान्य दिले. महिला बचतगटांना आर्थिक बळ देण्यासाठी त्यांनी शिवणकला प्रशिक्षण व स्वावलंबन शिबिरे घेतली. विद्यार्थ्यांना सायकल, छत्री, वह्या, गणवेश आणि शैक्षणिक साहित्य वाटप करून शिक्षण क्षेत्राला प्रोत्साहन दिले.*
*आरोग्याच्या दृष्टीने डेंग्यू प्रतिबंधक फवारणी, मोफत वैद्यकीय शिबिरे आणि रक्तदान शिबिरे राबवली. तसेच नागरिकांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही बसवून सुरक्षित वातावरण निर्माण केले. सिंहासनाधीश्वर तरुण गणेश मंडळाच्या माध्यमातून त्यांनी समाजोपयोगी कामांची परंपरा जपली आहे. या मंडळाच्या माध्यमातून शहरातील शाळांना गणेश मूर्ती भेटवस्तू, स्वच्छ परिसर स्पर्धा, आरोग्य उपक्रम, आणि शैक्षणिक मदत कार्यक्रम राबवले गेले.*
*गणेश विसर्जन मिरवणुकीऐवजी प्रभागात गणपती मंदिर उभारण्याचा संकल्प करून त्यांनी धार्मिक व सामाजिक बांधिलकी जपली. राजकन्या अडसूळ यांनी “जनतेचा शिपाई आपल्या दारी” ही मोहीम राबवत घराघरात जाऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्यावर तत्काळ उपाय केले. त्यांच्या या कार्यामुळे नागरिकांमध्ये विश्वास निर्माण झाला असून, शहरात त्यांचा प्रभाव सातत्याने वाढत आहे. नगरसेविका पदाच्या कार्यकाळात सौ अडसूळ यांनी अनेक विकासाभिमुख कार्य केल्याने भाजपाने त्यांना उमेदवारी द्यावी, अशी मागणी सर्वसामान्य जनतेमधून समोर येत आहे. विशेष म्हणजे, दस्तुरखुद्द सर्वसामान्य जनतेमधूनही राजकन्या आडसुळ यांच्या उमेदवारीची मागणी केली जात आहे**नागरिकांच्या प्रतिक्रिया*
🗣️ *अनिल खोत, ज्येष्ठ नागरिक रामनगर*
*राजकन्या ताईंच्या प्रभागात गेलं तर दिसतं — रस्ते स्वच्छ, लाईट सुरू आणि लोक समाधानी! त्या नगराध्यक्ष झाल्या तर धाराशिव बदलणार यात शंका नाही*”*🗣️ *रेखा मसने, महिला बचतगट प्रमुख*
*महिलांसाठी त्या कायम पुढे आल्या. बचतगटांना प्रशिक्षण, आरोग्य शिबिरे, आणि स्वावलंबनाच्या योजना – हे सर्व त्यांच्या नेतृत्वातच झालं*🗣️ *सागर मोरे, तरुण कार्यकर्ता:*
*राजकारणात दाखवण्यापेक्षा काम करावं हे त्यांच्याकडून शिकायला मिळतं. ‘जनतेचा शिपाई’ हे फक्त वाक्य नाही, ती त्यांची कार्यशैली आहे*🔷 *महिला नेतृत्वाला जनतेचा पाठिंबा*
*शहरातील महिला वर्ग, सामाजिक संस्था आणि गणेश मंडळांचं समर्थनही राजकन्या अडसूळ यांच्या बाजूने झुकत आहे.*
*महिलांचं नेतृत्व म्हणजे केवळ राजकारण नाही, ती एक सामाजिक चळवळ आहे. राजकन्या ताईंचं नेतृत्व धाराशिवसाठी योग्य दिशा ठरेल*, *अशी प्रतिक्रिया नागरिकांकडून मिळाली**सामाजिक बांधिलकीचं वेगळं उदाहरण*
*गणेश मंडळाच्या माध्यमातून त्यांनी केवळ धार्मिक नव्हे तर सामाजिक उपक्रम राबवले आहेत. यंदाच्या गणेशोत्सवात त्यांनी विसर्जन मिरवणुकीऐवजी गणपती मंदिर उभारणीचा संकल्प करून संवेदनशीलतेचं उदाहरण दिलं.*
*त्याचबरोबर “जनतेचा शिपाई आपल्या दारी” ही मोहिम सुरू करून नागरिकांच्या समस्या थेट ऐकण्याची परंपरा रुजवली आहे*
*“ग्राऊंड कनेक्ट” सर्वात मजबूत**शहरातील प्रत्येक गल्ली, परिसर, वसाहतीत त्यांचा थेट संपर्क असल्याने “ग्राऊंड लेव्हल कनेक्ट”च्या बाबतीत त्या आघाडीवर असल्याचे मानले जाते.*
*त्यांची ‘जनतेचा शिपाई आपल्या दारी’ मोहीम आजही अनेकांना आठवते. या उपक्रमामुळे नागरिकांच्या छोट्या-मोठ्या समस्या घरपोच सोडवल्या गेल्या आणि जनतेशी विश्वासाचं नातं घट्ट झालं.**विकास आणि स्वच्छतेचा दुहेरी फॉर्म्युला*
*त्यांनी नगरसेविका असताना प्रभागात पाणीपुरवठा, स्वच्छता, डांबरी रस्ते, गटारी आणि सीसीटीव्ही बसवणे यासारखी मूलभूत कामे केली.*
*महिला बचतगटांना स्वावलंबी बनवण्यासाठी प्रशिक्षण शिबिरे घेतली; तर विद्यार्थ्यांसाठी सायकल*, *छत्री व शैक्षणिक साहित्य वाटप केलं.*
*स्वच्छ प्रभाग – सुगंधित शहर” हा त्यांचा लोकाभिमुख उपक्रम आजही चर्चेत आहे.**महिला गट आणि युवा वर्गाचा ठाम पाठिंबा*
*भाजपमधील महिला पदाधिकारी, बचतगट संघटनांपासून ते गणेश मंडळातील तरुण कार्यकर्त्यांपर्यंत, राजकन्या अडसूळ यांच्याविषयी सकारात्मक चर्चा सुरू आहे.*
*युवा नेते सनी पवार यांच्या सहकार्यामुळे त्यांना युवकांचा मजबूत पाठिंबा मिळत असून, शहरातील ‘तरुणाई + महिला मतदार’ हे समीकरण त्यांच्या बाजूने झुकत आहे.*🔶 *गणेश मंडळांची एकजूट*
*धाराशिवमधील विविध गणेश मंडळांनी शहराच्या विकासात सौ. अडसूळ यांच्या कामांची दखल घेत “शहराला सेवाभावी नेतृत्व हवे” अशी मागणी केली आहे.*
*अनेक मंडळांनी एकमुखी ठराव घेत “राजकन्या ताई आमच्या नगराध्यक्ष व्हाव्यात” अशी घोषणा केली आहे.*भाजपच्या अंतर्गत बैठकींमध्येही त्यांच्या नावाची हवा*
*भाजपच्या शहर कार्यकारिणीत अलीकडील बैठकीत महिला नेतृत्वाला प्राधान्य देण्याची चर्चा झाली असून, त्यात सौ. अडसूळ यांचं नाव पुढे आले आहे. वरिष्ठ पातळीवरील काही नेत्यांनी त्यांचं काम, लोकसंपर्क आणि जनाधार याची नोंद घेतल्याची माहिती समोर येते आहे.*


