भिलवडी येथील सलीम नाष्टा सेंटर येथे ऋषी भैय्या टकले, सुरेंद्र भैय्या वाळवेकर यांनी घेतला भजीचा आस्वाद : गाडेमालक समाधानी





दर्पण न्यूज भिलवडी /पलूस : –
सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील भिलवडी रविवारीच्या बाजारात सलीम नाष्टा सेंटर येथे ऋषी भैय्या टकले आणि सुरेंद्र भैय्या वाळवेकर यांनी घेतला भजीचा आस्वाद
घेतला. यामुळे गाडामालक समाधानी झाला.नेहमीच गोरगरीब जनतेच्या सुखदुःखा मध्ये धाऊन येणारे सामाजिक कार्याची आवड असणारे शिव मल्हार हिंदुस्थान क्रांती सेनेचे सांगली जिल्हा अध्यक्ष ऋषी भैय्या टकले यांनी रविवारी बाजारात सलीम नाष्टा सेंटर येथे आपुलकीचे नाते जपत कांदा भजी आणि मिरची भजीचा आस्वाद घेतला. आपल्या जवळच्या सामान्य माणसाला पुढे जाण्यासाठी शाबासकी थाप मारत, आपल्या व्यवसायासाठी भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, असा आशिर्वाद ऋषी भैय्या टकले यांनी बडकूल रोजे आणि त्यांच्या परिवाराला दिला.
तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र भैय्या वाळवेकर यांनीही सलीम नाष्टा सेंटर येथे भजीचा आस्वाद घेत पुन्हा एकदा सामान्य माणसात मिळून मिसळून वागण्याचा आदर्श निर्माण केला.
सलीम नाष्टा सेंटरचा गाडा हा गेली चाळीस वर्षे हालाखीच्या परिस्थितीत सुरू आहे. कष्ट करण्याचे आपलं सातत्य
हाजीलाल रोजे यांनी सोडले नाही. यांच्या कष्टाला हातभार पत्नी, दोन मुले लावत आहेत. आपण हितचिंतक आणि ग्राहक म्हणून चटकदार, खुसखुशीत भजी, वडापाव आणि खाद्य पदार्थांचा आस्वाद घेऊन एका व्यावसायिकाला हातभार लाऊया, आपण ग्राहक म्हणून नक्कीच लावालं.(सलीम नाष्टा सेंटरचा गाडा भिलवडी बाजारपेठ स्टेज शेजारी खालच्या बाजूला आहे)


