भाजपाचे उमेदवार प्रा.डॉ. महेश पाटील (सर), मंजुषा पाटील यांचा भिलवडी जि प गट, वसगडे प स गणात जोरदार प्रचार ; भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते यांचा मोठा सहभाग


दर्पण न्यूज भिलवडी/पलूस (अभिजीत रांजणे):-
भिलवडी जिल्हा परिषद गटातील भाजपाचे उमेदवार प्रा.डॉ. महेश रंगराव पाटील (सर) आणि वसगडे पंचायत समिती गणातील भाजपाचे उमेदवार मंजुषा धोंडीराम पाटील यांनी वसगडे येथे जोरदार प्रचार केला. या प्रचारासाठी भिलवडी, वसगडे आणि इतर गावांतील भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांचा मोठा सहभाग होता.भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार
सुनिता शिवाजी गायकवाड भिलवडी पंचायत समिती गण, प्रा.डॉ. महेश रंगराव पाटील (सर) भिलवडी जिल्हा परिषद गट, मंजुषा धोंडीराम पाटील वसगडे पंचायत समिती गण यांचा समावेश आहे.वसगडे येथे भिलवडी जिल्हा परिषद गटातील भाजपाचे उमेदवार प्रा.डॉ. महेश रंगराव पाटील (सर) आणि वसगडे पंचायत समिती गणातील भाजपाचे उमेदवार मंजुषा धोंडीराम पाटील यांनी घरोघरी प्रचार केला. लोकांना भारतीय जनता पक्षाच्या धडाकेबाज कामगिरीविषयी माहिती सांगितली. तसेच भारतीय जनता पक्षाचे उमेदवार यांना विजयी करा, असे आवाहन केले.
यावेळी भाजपाचे उमेदवार प्रा.डॉ. महेश रंगराव पाटील (सर) यांनी सांगितले की, भिलवडी जिल्हा परिषद गटातून भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना भरभरून प्रतिसाद मिळत आहे. लोकही भाजपच्या कामांवर समाधानी आहेत. त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांचा नक्कीच विजय होणार होईल.यावेळी भिलवडी जिल्हा परिषद गट, भिलवडी पंचायत समिती गण, वसगडे पंचायत समिती गणातील भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते महिला, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.




