क्रीडामहाराष्ट्र

माजी सहकार मंत्री डॉ विश्वजीत कदम यांच्या हस्ते भिलवडी येथे डॉ.पतंगराव कदम स्मृती चषक बक्षीस वितरण समारंभ उत्साहात

डॉ.पतंगराव कदम स्मृती चषक मार्दवी जिमखाना मायणी संघाने पटकावला ; क्रिकेट प्रेमींची मोठ्या संख्येने उपस्थिती

भिलवडी : सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील भिलवडी येथील चॅलेंजर्स ग्रुपच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कृष्णाकाठ प्रिमियर लीग क्रिकेट स्पर्धेमध्ये मार्दवी जिमखाना मायणी संघाने विजेतेपद पटकावले. त्यांना डॉ.पतंगराव कदम स्मृती चषक आणि रोख 77777 रुपयांचे बक्षीस मिळाले.

दुसरा क्रमांक कर्णवीर केसरी प्रतिष्ठान कडेगांव या संघाने पटकावला.त्यांना रोख 55555 आणि डॉ.पतंगराव कदम स्मृती चषक देण्यात आला.बक्षीस वितरण समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून माजी मंत्री डॉ.विश्वजित कदम उपस्थित होते.
स्पर्धेचे हे 30 वे वर्ष तर लीगचे 8 वे वर्ष आहे.
अंतिम सामन्याची सुरुवात राष्ट्रगीत आणि राज्यगीताने झाली.माजी मंत्री डॉ पतंगराव कदम यांना या वेळी अभिनव पद्धतीने नृत्याविष्काराने अभिवादन करण्यात आले.
प्रथम फलंदाजी करताना मार्दवी जिमखाना मायणी संघाने निर्धारित 6 षटकांमध्ये तडाखेबंद 97 धावा केल्या. शुभम कदम याने 16 चेंडूत 49 धावांची खेळी केली आणि त्याला लखन सकट याने 21 धावा करत मोलाची साथ दिली.
उत्तरादाखल खेळताना कडेगांव संघ मायणी संघाच्या तिखट माऱ्यासमोर पूर्णपणे ढेपाळला.कर्णधार विश्वजीत गरुड (19) आणि संग्राम कदम (13) यांनी थोडाफार प्रतिकार केला.निर्धारित 6 षटकांमध्ये कडेगांव संघाने 57 धावा केल्या.40 धावांनी विजय मिळवत मायणी संघाने विजेतेपदाला गवसणी घातली.लखन सकट याने 4 बळी मिळवले.

तिसरा क्रमांक आदिमाया त्रिनेय स्पोर्ट्स कराड संघाने पटकावला. त्यांना 22222 रुपये आणि डॉ.पतंगराव कदम स्मृती चषक देण्यात आला.चतुर्थ क्रमांक विश्वजीत युथ फाऊंडेशन कवठेमहांकाळ संघाने मिळवला.त्यांना 22222 रुपये
देण्यात आले.
सामना संपल्यानंतर लगेचच बक्षीस वितरण समारंभ घेण्यात आला.
बक्षीस वितरण समारंभासाठी राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी संयोजकांना, विजय संघांना शुभेच्छा दिल्या.अनेक चॅलेंजर्स ग्रुपच्या विविध उपक्रमांना यापुढेही मदत करण्याची ग्वाही दिली.
बक्षीस वितरण समारंभासाठी माजी जि.प. सदस्य संग्राम पाटील,
द.भा.सोसा.चे माजी चेअरमन बाळासो मोहिते,माजी उपसरपंच चंद्रकांत पाटील,तंटामुक्ती समितीचे माजी अध्यक्ष विलास पाटील, बी.डी.पाटील,
बाळासाहेब मोरे,बाबासो मोहिते,विजय कांबळे, व्यापारी एकता असो.चे सर्व संचालक उपस्थित होते.
अंतिम सामना ड्रोन कॅमेऱयाने शूटिंग करण्यात आला. सामना पाहण्यासाठी सुमारे 10 हजार प्रेक्षक उपस्थित होते. प्रेक्षकांना सामना पाहता यावा यासाठी मोठ्या स्क्रीनची ही व्यवस्था करण्यात आली होती. सर्वच सामने पृथ्वीराज live च्या माध्यमातून यूट्यूब वरून थेट प्रक्षेपित करण्यात आले.सामन्याचे पंच म्हणून विशाल नाईक,अजित जगताप, संदीप मोटकट्टे, सचिन साठे आणि विशाल गुरव यांनी काम पाहिले.
समालोचनाची जबाबदारी प्रवीण मोहिते यांनी सांभाळली. गुणलेखक म्हणून महेश कानिटकर यांनी काम पाहिले.

स्पर्धेमध्ये मॅन ऑफ दी सिरीजसाठी असलेला मायक्रो ओव्हन मायणी संघाच्या लखन सकट याने मिळवला .मॅन ऑफ दी मॅच साठी असलेल्या वॉटर प्युरिफायरचा मानकरी मायणी संघाचा शुभम कदम ठरला. सर्वोत्कृष्ट गोलंदाज गार्डी संघाचा अक्षय थोरात आणि सर्वोत्कृष्ट फलंदाज मायणी संघाचा शुभम कदम हे खेळाडू ठरले.सर्वाधिक षटकारासाठी असलेले चांदीचे कडे संदीप मकवाना याने मिळवले.
उदयोन्मुख खेळाडूंसाठी असलेले क्रिकेटचे किट कवठेमंकाळ संघाच्या प्रतीक पवार याला देण्यात आले.
इतर वैयक्तिक बक्षिसे अशी-

उत्कृष्ट क्षेत्ररक्षक –
सुरेश मोहिते गार्डी
उत्कृष्ट यष्टीरक्षक –
जिलानी शेख कराड
सर्वोत्कृष्ट कर्णधार-
इंजमाम नायकवडी सांगली
शिस्तबद्ध संघ –
जय शिवराय वाळवा
उत्कृष्ट झेल –
रोहित जाधव भिलवडी स्टेशन
स्पर्धेतील इम्पॅक्ट खेळाडू –
सुरेश कांबळे कवठेमहांकाळ

क्षणचित्रे
चॅलेंजर्सच्या प्रत्येक खेळाडूला गणवेश होता. प्रत्येक खेळाडूच्या गणवेशावर खेळाडूच्या आईचे नाव प्राधान्यक्रमाने लिहून आईचाही सन्मान करण्यात आला. चॅलेंजर्सच्या वतीने विश्वजीत कदम यांनाही त्यांच्या आई-वडिलांच्या नावाचा उल्लेख असणारा गणवेश देण्यात आला.

वैयक्तिक बक्षिसांमध्ये मायक्रो ओवन, वॉटर प्युरिफायर,गिझर,मिक्सर, ग्राइंडर ब्रेड टोस्टर, टेबल फॅन अशी घरात वापरण्यात येणारी बक्षीस होती. घरच्यांकडून खेळाडूंना पाठिंबा मिळावा यासाठी अशी बक्षिसे ठेवण्यात आली होती.

या स्पर्धेचे दररोज थेट प्रक्षेपण सुरू होते.
याचबरोबर आंतरराष्ट्रीय सामान्यांप्रमाणे पंचांच्या निर्णयाविरोधात दाद मागण्यासाठी रिव्ह्यू घेण्याची ही व्यवस्था केली होती.

मैदानाच्या बाहेर झेल घेणाऱ्या प्रेक्षकांनाही बक्षिसे देण्यात येत होती

स्व.डॉ.पतंगराव कदम यांना चॅलेंजर्सच्या खेळाडूंनी मानवंदना देताना साहेबांच्या चेहऱ्याचा मुखवटा परिधान केला होता. याचबरोबर हेमंत रकटे यांच्या मार्गदर्शनाखालील नृत्य अकॅडमी ने नृत्याविष्काराने स्व.पतंगराव कदम यांना अभिवादन केले. यावेळी अनेकांना आपले अश्रू आवरता आले नाहीत.

मैदानावर प्रेक्षकांची उपस्थिती प्रचंड होती. ती शक्यता लक्षात घेऊन त्यांच्या बैठकीसाठी मोठ्या गॅलरीची व्यवस्था करण्यात आली होती.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!