पलूस शहरात रमेश टेक्स्टाईल चे उद्घाटन धुमधडाक्यात
पलूस पंचक्रोशीतील ग्राहकांना अनोखी पर्वणी

पलूस:-सांगली जिल्हा
पलूस शहरात पलूस पोलीस ठाणे जवळ मेन रोडला रमेश टेक्स्टाईल या नावाने साधना बनकर माळी यांनी नवीन कापड दुकानाचे दालन सुरू केले आहे. आज रमेश टेक्स्टाईल या नवीन दालनाचे उद्घाटन धुमधडाक्यात संपन्न झाले.पलूस आणि पलूस पंचक्रोशीतील सर्व नागरिकांना एका छताखाली लहान मुलांपासून मोठ्यापर्यंतचे सर्व स्त्री पुरुष लहान मुले मुली यांचे करिता लागणारे रेडिमेड कपडे, कटपीस, साड्यांचे वेगवेगळे प्रकार एकाच छताखाली उपलब्ध करून देण्याचे काम रमेश टेक्स्टाईल यांनी केले आहे. आज या उद्घाटन समारंभाच्या निमित्ताने आमदार अरुण लाड तसेच रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष महेंद्र लाड, सम्राट बाबा महाडिक , पैलवान चंद्रहार पाटील, राजारामबापू कारखान्याचे संचालक आणि मामासाहेब पवार बँकेचे चेअरमन बाळासाहेब पवार ,व्हाईस चेअरमन दिलीप नलवडे, किरण लाड ,क्रांती कारखान्याचे चेअरमन शरद लाड, व्हॉइस चेअरमन दिगंबर पाटील प्रशांत पवार यांच्यासह पंचक्रोशीतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते .
नव्याने सुरू झालेल्या दालनाच्या उद्घाटन समयी अनेक खरेदीदारांनी उपस्थिती दर्शवून ,खरेदीचा आनंद घेतला. यावेळी साधना बनकर माळी,कृष्णा माळी ,रामेश्वर माळी ,जयदीप माळी, आनंद माळी ,अतुल माळी तसेच माळी परिवारातील सर्वजणांनी आलेल्या पाहुण्यांचे स्वागत केले.साधना बनकर माळी म्हणाल्या, ग्राहकांच्या करिता आम्ही सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत ,एक वेळ आमच्या रमेश टेक्स्टाईल ला भेट देऊन आपण आपली खरेदी करावी . आलेल्या मान्यवरांनी रमेश टेक्स्टाईल हे दालन परिसरात आदर्श ठरेल अशा शुभेच्छा दिल्या. नागरिकांनीही चांगल्या पद्धतीची खरेदी चे ठिकाण उपलब्ध झाल्याने समाधान व्यक्त केले.