राज्यस्तरीय शालेय शासकीय फ्लोअरबॉल स्पर्धेत कोल्हापूर विभागाला कास्यपदक

कोल्हापूरःअनिल पाटील
परभणी येथे नूकत्याच झालेल्या शालेय शासकीय फ्लोअरबॉल स्पर्धेमध्ये 8 संघ सहभागी झाले होते.
कोल्हापूर विभागातून 19 वर्षा खालिल मुली मध्ये आदर्श गुरुकुल पेठ वडगाव व मुलामध्ये शहाजी कॉलेज कोल्हापूर तर 17 वर्षांखालील मुली मध्ये जनतारा विद्यालय जयसिगपूर मुलांच्या मध्ये दादासाहेब मगदुम हायस्कूल कोल्हापूर या शाळेतील संघांनी सहभाग घेतला होता. यामध्ये 17 वर्षांखालील मुली जनतारा विद्यालय जयसिगपूर संघांनी कांस्य पदकाची कमाई केली तर 17 वर्षांखालील मुलांच्या मध्ये दादासाहेब मगदुम हायस्कूल कोल्हापूर या संघांने कांस्य पदकाची कमाई केली.
या खेळाडूंना जिल्हा क्रीडा अधिकारी डॉ चंद्रशेखर साखरे ” श्री .जमादार , रोहिणी मोकाशी , बालाजी बरबडे गौरव खामकर, कोल्हापूर जिल्हा फ्लोअरबॉल सघटनेचे अध्यक्ष दिपक शिरसागर, सचिव प्रशांत मोटे, खजानिस . प्रफुल्ल धुमाळ, नरेंद्र कुपेकर, नितिन लंबे, रोहित पाटील, सुविचार परमाजे, मंजुषा पाटील , व्हीं आर पाटील सागर वडर, गौरव जाधव, प्रसाद खवरे आदींचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.