आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र

सर्वगुण संपन्न विद्यार्थी घडविण्यात क्षितिज गुरुकुल विद्यानिकेतनचे एक पाऊल पुढे : व्याख्याते गणेश शिंदे

बुरुंगवाडीत क्षितिज फेस्टला उत्साहात प्रारंभ

 

दर्पण न्यूज भिलवडी  : –

विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत शाळा, शिक्षकां इतकीच पालकांची भूमिका महत्वाची आहे.पारंपरिक पद्धतीने दिल्या जाणाऱ्या शिक्षणापेक्षा ही विद्यार्थ्यांमधील कौशल्य वाढविणारी शिक्षण पद्धती गरजेची आहे.चाकोरी बाहेरील शिक्षण देऊन सर्वगुण संपन्न विद्यार्थी घडविण्यात क्षितिज गुरुकुल विद्यानिकेतनने एक पाऊल पुढे टाकले असल्याचे प्रतिपादन प्रसिद्ध व्याख्याते गणेश शिंदे यांनी केले.

सिद्ध विनायक शिक्षण प्रसारक मंडळ संचलित क्षितिज गुरुकुल विद्यानिकेतन अँड ज्युनिअर कॉलेज बुरुंगवाडी ता.पलूस या सैनिकी पॅटर्न निवासी विद्यालयाचा वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ अर्थात क्षितिज फेस्टच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते.रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष संचालक महेंद्र (आप्पा) लाड अध्यक्षस्थानी होते.
स्पर्धेच्या युगात टिकणारे गुणवंत विद्यार्थी घडविणारा क्षितिज गुरुकुलचा पॅटर्न आदर्शवत असल्याचे प्रतिपादन महेंद्र लाड यांनी केले.
रांगोळी, चित्रकला, हस्ताक्षर व हस्तकला प्रदर्शनाचे उद्घाटन कृष्णा साखर कारखान्याचे माजी संचालक ब्रह्मानंद पाटील यांच्या हस्ते तर विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक रमेश हजारे यांच्या हस्ते करण्यात आले.
पोलिस उपनिरीक्षकपदी निवड झालेबद्दल केतन जाधव यांचा विशेष सत्कार करण्यात आला.मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुनिल (बापू) जाधव,कार्यवाह सौ.वनिता जाधव,पोलिस उपनिरीक्षक आकाश जाधव,एम.टी.देसाई,बी.पी.जाधव,विजयकुमार चोपडे, प्रा.गुंडाजी साळुंखे,अमित मिरजकर,आनंदा उतळे,
जी.बी.लांडगे,रवी राजमाने,रमेश पाटील,अर्जुन जाधव,बाळासो जाधव,
राजेश चव्हाण,सुभाष सूर्यवंशी,संतोष सूर्यवंशी,मनोज कोळेकर,बजरंग जाधव,पोपट हवलदार,विनोद पाणबुडे,
आदी मान्यवर उपस्थित होत.
प्रास्ताविक व स्वागत मुख्याध्यापिका दिपाली जाधव यांनी केले.अहवाल वाचन स्वाती पाटील यांनी केले.सूत्रसंचालन शिल्पा मगदूम,अर्चना शिंदे यांनी केले.आभार पी.आर.पाटील यांनी मानले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!