दुधोंडी येथील कृष्णाकाठ उद्योग समूहास सांगली जिल्ह्याचे वन विभागाचे ACF डॉ. अजितकुमार साजणे यांची भेट
कृष्णाकाठ उद्योग समूहाचे संस्थापक लोकनेते जे के (बापू) जाधव, मानसिंग को ऑप बँकेचे चेअरमन सुधीर (भैय्या) जाधव यांच्या हस्ते सत्कार

दर्पण न्यूज दुधोंडी :- सांगली जिल्ह्याचे वन विभागाचे ACF मा. श्री. डॉ. अजितकुमार साजणे (साहेब) यांनी आज कृष्णाकाठ उद्योग समूहास भेट दिली.
यावेळी त्यांचा सत्कार कृष्णाकाठ उद्योग समूहाचे संस्थापक लोकनेते मा श्री जे के (बापू) जाधव, मानसिंग को ऑप बँकेचे चेअरमन सुधीर (भैय्या) जाधव, यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी या सत्कारप्रसंगी विसापूर चे युवा उद्योजक विनायक (शेठ) माने, कृष्णा ग्रामीण बिगर शेती पतसंस्थेचे माजी चेअरमन रवींद्र आरबूने, पलुस कडेगाव विधानसभा युवक काँग्रेस चे अध्यक्ष प्रमोद (दादा) जाधव, डॉ पतंगरावजी कदम खरेदी विक्री संघाचे संचालक सुरेश आबा रानमाळे, कृष्णाकाठ डीहायड्रेशन संस्थेचे माजी व्हा चेअरमन राजेंद्र (भाऊ) नलवडे, मानसिंग बँकेचे जनरल मॅनेजर संभाजी (भाऊ) जाधव, लखन यादव, हर्षवर्धन जाधव, पै मंगेश देसाई, संभाजी निकम, आनंदा आरबूने, अभिजीत आरबूने तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.