रामानंदनगर येथे फार्मसी दिन उत्साहात
विद्यार्थ्यांनी पथनाट्याद्वारे फार्मासिस्ट चे महत्व दिले पटवून
पलूस: रामानंदनगर येथे फार्मसी दिन उत्साहात साजरा झाला.रामानंदनगर येथे विटा येथील आदर्श फार्मसी कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी फार्मसिस्ट दिनानिमित्त पथनाट्य सादर केले. यावेळी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच जयसिंग नावडकर,माजी सभापती दीपक मोहिते, डी एन कुंभार, बबन माने, विजय लोंढे, मन्सूर मुजावर, दिनकर कांबळे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जगभरातील लोकांचे आरोग्य चांगले रहावे यासाठी औषध विक्रेत्यांनी दिलेल्या योगदानाविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचे माध्यम म्हणजे वर्ल्ड फार्मासिस्ट डे होय. आजाराने ग्रस्त असणारे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना शांतपणे समजून घेत आपली सेवा देणारे फार्मासिस्ट हे आरोग्य सेवा प्रणालीचे अविभाज्य भाग आहेत. यासंबंधीची माहिती विद्यार्थ्यांनी पथनाट्याद्वारे सादर केली. औषधालय, फार्मासिस्ट त्यांची भूमिका आणि त्यांचे योगदान याविषयी जागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने विद्यार्थ्यांनी प्रा.काजल होवाळ आणि प्रा. सोनाली गुरव, यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर केले तसेच घरोघरी जाऊन औषधांचे दुष्परिणाम, औषधांचे डोस, औषधांची साठवण याविषयी कौन्सिलिंग केले. यावेळी जयसिंगराव नावडकर, यांनी विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प देऊन त्यांना फार्मासिस्ट दिनाच्या शुभेच्छा दिल्या. सामाजिक कार्यकर्ते अख्तर पिरजादे यांनी पथनाट्यातून विद्यार्थिनी प्रबोधन केल्याबद्दल त्यांचे गावच्या वतीने आभार मानले.