अखेर “त्या” वृत्तामुळे कॉन्ट्रॅक्टरला आली जाग ; किर्लोस्करवाडी रेल्वेस्थानक परिसरात खडी पसरण्यास केली सुरुवात

पलूस :- किर्लोस्करवाडी रेल्वे स्थानक परिसरामध्ये
उड्डाणपूलाचे काम सुरू आहे . त्या उड्डाणपुलाचा परिसरातील नागरिकांना काहीही उपयोग होणार नाही. त्याचा त्रासच होणार आहे. कारण त्याची जागा योग्य नाही, तरी देखील त्याचे काम सुरू झाले आहे. या ठिकाणी त्यांच्या असणाऱ्या माती आणि दलदल मुळे आणि डांबरी रस्ता त्यांनी ऊकरला असल्याने रेल्वे परिसरातील 200 मीटर रस्त्यावर चिखल पसरला आहे .साधारणपणे 200 मीटर अंतर चा पर्यायी रस्ता दुसरीकडून त्यांनी काढलेला आहे. त्यांच्या मातीमुळे रस्ता चिखलमय झाला आहे. त्यामुळे रस्त्यावर अनेक अपघात झाले आहे याबाबतचे वृत्त सी न्यूज ने दिल्यानंतर रेल्वे उड्डाणपुलाचे कॉन्ट्रॅक्टर यांना जाग आली त्यांनी चिखलमय असणाऱ्या रस्त्यावर खडी पसरण्याच्या कामाला सुरुवात केली आहे त्यामुळे रेल्वे प्रवासी कुंडल किर्लोस्करवाडी रस्त्यावर वाहतूक करणारे वाहनधारक किर्लोस्कर कंपनीतील कामगार व शाळेला जाणारे विद्यार्थी आणि पालक यांना जो त्रास होत होता. तो थोड्याफार प्रमाणात कमी होणार आहे. पलूस तालुक्याचे तहसीलदार निवास ढाणे यांनी संबंधित काम करणाऱ्या मॅनेजर ना तात्काळ खडी पसरण्याचे आदेश दिले होते .संपूर्ण दीडशे ते दोनशे मीटर असणाऱ्या रस्त्यावर संपूर्ण खडी पसरण्यात यावी. लावलीजाव काम केलेले आम्हाला चालणार नाही .सर्वसामान्य जनतेला कसलाही त्रास झाला नाही पाहिजे याची खबरदारी कॉन्ट्रॅक्टरने, रेल्वे विभागाने ,केंद्र सरकारने घ्यावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा माजी सरपंच जयसिंग नावडकर आणि अख्तर पिरजादे यांनी दिला .
संबंधित तज्ञांची समिती नेमून ज्या ठिकाणी उड्डाणपूल आणि भुयारी पूल हे काम सुरू आहे. ते योग्य ठिकाणी सुरू आहे का ?याचीही पाहणी करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. कारण वाहतुकीला हे दोन्ही पूल त्रासदायक आहेत. या पुलावरून कोणत्याही परिस्थितीत ऊस वाहतूक होणार नाही .रेल्वे लाईनच्या पलीकडे जवळपास तीन ते चार हजार हेक्टर ऊस वाहतुकीने अलीकडे असणाऱ्या क्रांती आणि सोनहिरा कारखान्याला जात असतो. याचे भान नेते मंडळीना यावे असे ही पिरजादे म्हणाले.