महाराष्ट्रराजकीय

कोल्हापूर जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या ( ग्रामीणच्या ) युवा मोर्चाच्या अध्यक्षपदी रविश पाटील यांची निवङ

 

कोल्हापूरःअनिल पाटील

राधानगरी तालूक्यातील कौलव येथील यूवक नेते””कोल्हापूर जिल्हा भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष रविश पाटील— कौलवकर यांच्या कार्याची दखल पक्षाने घेवून त्यांची कोल्हापूर जिल्हा ग्रामीणच्या यूवा मोर्चाच्या अध्यक्षपदी नूकतीच निवङ करण्यात आली. या निवङीचे पञ भारतीय जनता पार्टीचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील यांनी दिले. या निवङीमूळे त्यांचे सर्वञ अभिनंदन होत आहे.
या निवङीसाठी भारतीय जनता पार्टी महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष .रवींद्रचव्हाण ‘, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील ” , खासदार . धनंजय महाडिक “,भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्ष . नाथाजी पाटील “, आमदार अमल महाडिक “, आमदार .शिवाजी पाटील”, भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा प्रदेश सचिव अल्केश कांदळकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
यूवा मोर्चाचे नूतन जिल्हाध्यक्ष रविश पाटील— कौलवकर म्हणाले की””” भाजपच्या नेतेमंङळीनी माझ्यावर जो विश्वास टाकला तो सार्थ ठरविण्यासाठी पार्टीने जो कार्यक्रम दिला तो प्रभाविपणे राबविण्यासाठी अहोराञ परिश्रम घेणार आहे. भाजप पक्षाशी यूवकानां जोङण्याचे काम करून यूवकांचे संघटन उभे करणार आहे. जनतेचे प्रश्न व समस्यांचा भाजप यूवा मोर्चाच्या माध्यमातून आवाज उठवून जनतेला न्याय देणार आहे. कोल्हापूर जिल्ह्याची भाजपची यूवा मोर्चाची संघटना सर्वांच्या मार्गदर्शन आणी यूवा मोर्चा पदाधिकारी यांच्या सहकार्याने पूढे नेहणार आहे.पक्षाने दाखवलेला विश्वास सार्थ ठरवण्यासाठी माझे नेहमीच प्रामाणिक प्रयत्न असतील असे नूतन जिल्हा यूवा मोर्चाचे अध्यक्ष रविश पाटील यांनी पञकारांशी बोलतानां सांगितले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!